Breaking News

1/breakingnews/recent

31 डिसेंबर सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

        News24सह्याद्री - ग्रामपंचायत निवडणुकीत नगर तालुक्यात १९२९ अर्ज दाखल...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी



TOP HEADLINES

1. पिण्याचे पाणी मिळत नसल्याने मतदानावर टाकणार बहिष्कार
 ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदन तहसीलदार अमोल निकम, ग्रामसेविका शकुंतला भालेराव यांना देण्यात आलंय

2. वरवंडी-मुळानगर सार्वत्रिक निवडणूक प्रतिष्ठाची 
निवडणूक लढविण्यासाठी ग्रामस्थांनी  पुढाकार घेत निवडून आणण्यास कंबर कासणार असल्याचं म्हण्टलंय. यावेळी मोठ्या जल्लोषात,मुळानगर ते राहुरी मोटार सायकल रॅली काढली असून यात ग्रामस्थ हि  सहभागी होते .

3. तहसीलदारांच्या दालनात ठिय्या
 दिशादर्शक फलक लावले नसून वाहनधारकांच्या सुरक्षेचे कुठल्याही प्रकारची काळजी घेतलेली नाही त्यामुळे अपघात होऊन निष्पाप वाहनधारकांचा बळी गेला यामुळे अधिकारी व ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मनसेच्या वतीने तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले

4. मांज्यासह प्लास्टिक पतंग विक्री वर पालिकेची नजर
पंढरी असलेल्या नायलॉन मांजा सह प्लास्टिक पतंग विक्रीवर श्रीरामपूर नगरपालिकेच्या पथकाकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे शहरातील पतंग विक्रेत्यांनी नायलॉन माझ्यासह प्लास्टिक विक्री केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पालिकेने दिलाय

5. पारनेर मधील अतिक्रमणांवर कारवाई
 परिसरात होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर झाली तहसील कार्यालय तसेच बस स्थानक परिसरातील अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढावेत असे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले होते काही नाही स्वतःहून अतिक्रमणे काढली मात्र काही तशीच होती

6. जिल्ह्यात ४८ तुर खरेदी केंद्रे सुरु
शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने 11 तर फार्मर प्रोड्यूसर कंपनी ने 37 अशी 48 तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आली असून नाव नोंदणी नंतर प्रत्यक्षात तुर खरेदीला सुरुवात होणार

7. नववर्षात जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बार
पुढचा टप्पा नववर्षात येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे झाले याशिवाय जिल्ह्यातील १७ विकास संस्थांच्या निवडणुकीची ही प्रक्रिया सोमवारपासून सुरू केली जाईल

8. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा लागणार कस
जिल्हा परिषद निवडणुकांत गटातील गावांनी पदाधिकार्‍यांच्या मागे ताकद उभी केली म्हणून त्यांना जिल्हा परिषदेवर संधी मिळाली आता या पदाधिकाऱ्यांनी गावात लक्ष घातले आहे परंतु आता ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक गटतट हेवेदावे असल्याने पदाधिकारी कितपत गावांपर्यंत पोहोचतात व किती ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवतात याकडे लक्ष लागले आहे

9. किराणा दुकान फोडणारा जेरबंद 
 याबाबत कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही चोरी करणारा अक्षय यादव यास तालुक्यातील बारडगावच्या शिवारातून ताब्यात घेवून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

10. ग्रामपंचायत निवडणुकीत नगर तालुक्यात १९२९ अर्ज दाखल
निंबळक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वाधिक ९२ अर्ज दाखल झाले आहेत. नवनागापूर ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची चर्चा होती पण याठिकाणी ६९ अर्ज दाखल झाले आहेत. 



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *