Breaking News

1/breakingnews/recent

31 डिसेंबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

   News24सह्याद्री - गुगल पेच्या कस्टमर केअरमधून बोलतोय सांगून फसवणूक..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1. आठ बँकांना ४८३७ कोटींचा गंडा

 स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने आयव्हीआरएसएल (IVRCL) कंपनी, व्यवस्थापकीय संचालक ई सुधीर रेड्डी, सह-व्यवस्थापकीय संचालक आर बलरामी रेड्डी, काही सरकारी कर्मचारी आणि अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

2. रत्नागिरीत भीषण अपघात
चिंतामणी नावाची ही खासगी बस मुंबई येथून कणकवलीच्या दिशेने जात असतानाच हा अपघात झाला. बसमध्ये एकूण २७ प्रवासी होते. यापैकी २५ जणांना बाहेर काढण्यात आलं असून एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.  

3. आजपासून रेल्वे तिकीटांचं सुपरफास्ट बुकिंग
 कारण आता केवळ एका मिनिटात एकाच वेळी दहा हजार रेल्वे तिकीटांचं बुकिंग शक्य होणार आहे. सध्या एका मिनिटात 7500 तिकीटं बुक होतात. रेल्वेमंत्री पियुष गोयल आज दुपारी आयआरसीटीसीची नवी वेबसाईट लॉन्च करणार आहेत.  

4. गुगल पेच्या कस्टमर केअरमधून बोलतोय सांगून फसवणूक
प्रकरणी किनवट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फोन नंबरची तपासणी केली असता तो गुगल पे कस्टमर केअरचा असल्याचं दाखवत आहे.

5. नववर्षाचं सेलिब्रेशन पर्यटकांना 'महागत' 
शहरातींल संचारबंदीमुळं पर्यटकांनी कोकण, (Mahabaleshwar) महाबळेश्वरकडे त्यांचा मोर्चा वळवला आहे. पण, तिथे मात्र त्यांना एका भलत्याच अडचणीचा सामना करावा लागला आहे.

6. रेल्वे मंत्री पीयूष गोयल करणार रेल्वेची 'नवी वेबसाइट' लॉन्च
रेल्वे प्रवासापूर्वी प्रवाशांना नेहमीच तिकीट बुकिंग संदर्भात अनेक समस्या निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर तिकीट बुकिंग आणखी सुलभ करण्यासाठी भारतीय रेल्वे कडून नवीन वेबसाईट तयार करण्यात आली आहे. आज देशाचे रेल्वे मंत्री पीयूष गोयल रेल्वेची ही ‘नवी वेबसाइट’ लॉन्च करणार आहेत.  

7. बलात्कार पीडिता हद्दपार, बीडमधील अजब प्रकार
पीडित महिलेला आधार देण्याऐवजी महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत हद्दपारी ठराव मंजूर करण्यात आला आहे. पुरोगामी महाराष्ट्राची लक्तरं वेशीवर टांगल्याची ही घटना बीड जिल्ह्यातल्या पाच गावात घडली आहे.  

8. जम्मू काश्मीर पोलिसांकडून तीन दहशतवादी ठार
जम्मू काश्मीर पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर कुटुंबीयांने ते निर्दोष असल्याचा दावा केला आहे. या चकमकीत ठार झालेल्यांमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असून दुसरा ११ वीत शिकत होता असा दावाही कुटुंबीयांनी केला आहे. बनावट चकमकीत यांची हत्या करुन ते दहशतवादी असल्याचा दावा केला जात असल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.  

9. आजपासून रेल्वे तिकीटांचं सुपरफास्ट बुकिंग
रेल्वे तिकीटांचं बुकिंग आजपासून सुपरफास्ट होणार आहे. रेल्वे प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुकिंगमध्ये आता अडचणी येणार नाहीत. कारण आता केवळ एका मिनिटात एकाच वेळी दहा हजार रेल्वे तिकीटांचं बुकिंग शक्य होणार आहे. सध्या एका मिनिटात 7500 तिकीटं बुक होतात.

10. ब्रिटनहून परतलेले १२ प्रवासी ‘बेपत्ता’
 एकाच व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. या रुग्णाचे जनुकीय नमुने पुण्यात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, तर २३५ पैकी १२ जणांचा शोध लागलेला नाही. आरोग्य विभागाकडून त्यांची शोधाशोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *