25 डिसेंबर सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - गोळ्या घालून पतीचा खून पत्नीला सात वर्षांनंतर अटक....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. नागरिकांनी न घाबरता प्रतिबंधात्मक नियम पाळा -डॉ. राजेंद्र भोसले
जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासन आणि राज्य व केंद्र शासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे, घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क वापरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे.
2. बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला
कृपया एखाद्या व्यक्तीचा जीव जाण्याची वाट वन विभागाने पाहू नये. या वन्य प्राण्यांना पकडून जंगलात सोडून द्या. सर्वांना जीव मुठीत धरून जगावं लागतंय. रात्री अपरात्री लोकांना पाणी भरायला जावं लागत आहे. वन विभागाला विनंती आहे लक्ष द्या या प्राण्याचा बंदोबस्त करा अशी नागरिकनची मागणी आहे.
3. मुळा धरणातून सिंचनासाठी १५ जानेवारीपासून आवर्तन
मुळा धरणातून सिंचनासाठी रब्बी हंगामातील पहिले आवर्तन १५ जानेवारीपासून सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय रब्बीत एक तर उन्हाळी हंगामात दोन आवर्तनाच्या संभाव्य तारखांवर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलाय .
4. मुख्याधिकारी बदलूनही प्रश्न्न कायमच
गेल्या चार वर्षात पालिकेने सात मुख्यद्री बदलले तरीही शहरातील प्रश्न्न अद्याप प्रलंबित आहेत..त्यामुळे पुरेसं मनुष्यळा अभावी शहर स्वच्छ ठेवणे हे पालिकासमोर मोठे आव्हान आहे.
5. ऊस तोडणी मजुरांचे मुकादमाने केले अपहरण
याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मजुराची पत्नी हिने पोलिसात फिर्याद दिली आहे पोलिसांनी मेहबूब मुलांनी या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे हवालदार ज्ञानदेव याप्रकरणी तपास करत आहेत
6. लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटित महिलेवर अत्याचाराचे प्रकरण
या प्रकरणी पीडित यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
7. गोळ्या घालून पतीचा खून पत्नीला सात वर्षांनंतर अटक
ही घटना 8 सप्टेंबर 2013 रोजी शेवगाव मधील शास्त्रीनगर येथे घडली होती शांताबाई रामचंद्र सातपुते असे अटक केलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे
8. माहिजळगाव मध्ये पकडला गुटका
गुटखा विक्रेता लक्ष्मण सुंदर भिसे यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी पोलिस कर्मचारी सुनील खैरे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तालुक्यात अवैध धंद्या विरोधात धडक कारवाई सुरू केल्याचा वृत्त आहे.
कोरोनाचे रुग्ण काही प्रमाणात वाढत आहेत असं असताना देखील दुसरीकडे मात्र जिल्हा शल्यचिकित्सकांनी हे अध्यादेश काढून नगर जिल्ह्यातील कर्जत उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालय तसेच श्रीगोंदा चिचोंडी पाटील नेवासा पारनेर शनिशिंगणापूर याठिकाणचेही कोविड सेंटर बंद केले आहेत.
10. हॉटेलवर धाड टाकत साडेबारा हजारांची दारू जप्त
याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड शहरात विविध ठिकाणी अवैध देशी विदेशी दारुची विक्री चालू असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली
No comments
Post a Comment