25 डिसेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - फिजीओथेरपीच्या बहाण्याने महिलांचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. सुवेंदू अधिकारी यांचं डिपॉझिट जप्त करणार
भाजपाच्या नेत्या सुजाता मंडल यांनी तृणमूलमध्ये. दरम्यान, मंडल यांनी अधिकारी यांना थेट आव्हान देताना त्यांचं डिपॉझिट जप्त करु असं म्हटलं आहे.
2. BARC चे माजी सीईओ पार्थ दासगुप्तांना अटक
दासगुप्ता यांना पुणे जिल्ह्यातील राजगड पोलिस ठाणे क्षेत्रातून अटक करण्यात आली आहे. टीआरपी घोटाळ्यातील ही 15 वी अटक आहे.
3. फिजीओथेरपीच्या बहाण्याने महिलांचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक
एरीक अंकलेसारिया असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. नवी मुंबई पोलीसांनी त्याला माटुंगा येथून अटक केली आहे.
4. लोकप्रियता घटल्यानंतर ऱ्हासाच्या दिशेने सुरू झालेला प्रवास
शेतकऱ्यांना खुनी आणि दंगलखोर ठरवणे म्हणजे लोकप्रियता घटल्यानंतर उतरती कळा लागून ऱ्हासाच्या दिशेने सुरू झालेला हा प्रवास आहे असेच म्हणावे लागेल, अशी टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
5. कामावर जीन्स, टी-शर्टसह रंगीबेरंगी कपडे घालून येण्यास बंदी
महिलांना साडी, सलवार-कुर्ता, ट्राऊझर पॅन्ट-कुर्ता परिधान करून येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी हे आदेश जारी केले आहेत.
6. आजपासून लोणावळ्यात नाईट कर्फ्यू लागू
लोणावळा शहर, भुशी धरण, अॅम्बी व्हॅली, लवासा, ताम्हिणी घाट, सिंहगड रोड, खडकवासला या पर्यटन स्थळी फार्महाऊस आणि रिसॉर्टवर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांचा संचारबंदीत समावेश करण्यात आला आहे.
7. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची औरंगाबादच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती
राष्ट्रवादीकडून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची औरंगाबादच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदावरून धनंजय मुंडे यांची गच्छंती होऊन त्यांच्याऐवजी औरंगाबादच्या संपर्क प्रमुखपदी रादेश टोपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
8. दिग्गज नेत्या अस्मिता पाटील यांची भाजपला सोडचिठ्ठी
खडसेंपाठोपाठ त्या घड्याळ हाती बांधणार, म्हणजेच घरवापसी करणार, की शिवबंधनात बांधल्या जाणार, याची उत्सुकता वाढली आहे.
9. सोन्याला पुन्हा एकदा झळाळी
सोन्याचे आजचे भाव 51,410 प्रतितोळा तर चांदी 69,208 प्रतिकिलो आहे.लग्नसराई आणि ख्रिसमस या पार्श्वभूमीवर आज सोन्याच्या दरात काहीशी वाढ झालेली आढळून आली.
10. बीसीसीआय निवड समितीचं अध्यक्षपद चेतन शर्मा यांच्याकडे
बीसीसीआयने तीन सदस्यांच्या निवडीसाठी मुलाखती घेतल्या. या मुलाखतीनंतर तिघांची नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे अध्यक्षपदासाठी माजी गोलंदाज अजित आगरकर यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, त्यांची निवड होऊ शकली नाही.
No comments
Post a Comment