कोरोना दिवसा होत नाही का? माणसे नेत्याची सडकून टीका
मुंबई -
नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी रात्रीच्या संचारबंदीवर टीकेची झोड उठवली.त्यांनी काही प्रश्नही सरकारला विचारले 'मुख्यमंत्री काय फक्त रात्री फिरतो का?कोरोना दिवसा होत नाही का? नाईट कर्फ्यूच कारण काय आहे? अशा प्रश्नांची सरबत्ती करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी रात्रीच्या संचारबंदीवर टीकेची झोड उठवली. 'तुम्ही नाईट पार्ट्या करता, ते चालत, मग लोकांना बंधन का? कोण कुठे पार्ट्या करत, हे सर्वांना माहीत आहे' असा टोलाही देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर लगावला .
काही दिवसांपूर्वी उद्योगपतींना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी कशी दिली? त्यांच्यावर काय कारवाई झाली असे सवाल संदीप देशपांडे यांनी सरकारला विचारले आहेत. या संपूर्ण वर्षात लोकांचा कणा मोडला आहे. हॉटेल व्यावसायिक त्रस्त आहेत. प्रत्येक वेळी कोरोनाची भीती दाखवत आहात, तर अमेरिकेसारख पॅकेज द्या अशी मागणीही संदीप देशपांडे यांनी केली.
कोरोनाची फक्त भीती दाखवू नका. तुमची ती नाईट लाईफ, लोकांना फक्त कोरोना, असे आहे असा टोला देशपांडेंनी लगावला. या लॉकडाऊनच्या काळात कोणी नाईट लाईफ एन्जॉय केली, हे सर्वांना माहीत आहे, समजने वाले को इशारा काफी है, नाव घ्यायची गरज नाही' असा इशारा त्यांनी दिला. व्हीआयपी पार्ट्यांना सवलत दिली जाते, गरिबांनी हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं नाही, हे कुठलं लॉजिक आहे? असा सवालही संदीप देशपांडेंनी विचारला.

No comments
Post a Comment