22 डिसेंबर सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - पाथर्डीत युवतीवर अत्याचार करून लुटण्याची घटना....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. जिल्ह्यात दरोड्यांच्या आणि बुवाबाजीचा प्रकरणाचा बंदोबस्त करा-नीलम
यात त्यांनी नगर नाशिक परिसरात नुकत्याच अटक झालेल्या बुवाप्रमाणे अनेक नावांनी वावरणाऱ्या अन्य एका बुवाबाजी करणाऱ्या गुन्हेगारावरही कारवाई करण्याची मागणी केलीय. हा गुन्हेगार जमिनीतून सोने काढून देतो असं सांगत लोकांची फसवणूक करत असल्याची माहिती गोऱ्हे यांनी दिलीय.
2. ग्रामपंचायत बिनविरोध करणाऱ्या गावांना दहा लाखांचा निधी-आमदार बबनराव पाचपुते
बिनविरोध निवडणुका करणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील गावांना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी आपण देणार असल्याची घोषणा माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी केली आहे.
3. अखेर चौपदरी नगर-सोलापुर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची इ-निविदा
अनेक अडचणींमुळे गेली तीन ते चार वर्षांपासून या रस्त्याच्या कामाबाबतची सर्व कार्यवाही थांबली होती.तसेच .खासदार सुजय विखे यांनीही या रस्त्याच्या कामाबाबत पाठपुरावा केला होता.
4. शिरपुर ग्रामपंचायत व वि.का. सोसायटी बिनविरोध
आमदार नीलेश लंके यांच्या आवाहानास तालुक्यातून प्रतिसाद मिळत असताना शिरापूर ग्रामस्थांनीही आपली बिनविरोध निवडणूकीची परंपरा कायम राखून राळेगणसिद्धी पाठोपाठ पानोली, कारेगांव तसेच आता शिरापूर ग्रामपंचायत तसेच सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
5. युवतीवर अत्याचार करून लुटन्याची घटना
आरोपी देशपांडे गेल्या पाच दिवसापासून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
6. मंत्री झालो तरी कार्यकर्त्यांसोबत-खा. डॉ.सुजय विखे पाटील
तुम्ही केंद्रात मंत्री होणार का राज्यात बदल होईल का परंतु मी केंद्रात मंत्री झालो तरी पण मी आहे असाच राहीन अशी ग्वाही खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलेय.
7. वंचित बहुजन आघाडीचे सामूहिक मुंडन आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव येथे हे मुंडन आंदोलन करण्यात आले.संबधीत अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक, येथे घरकुल भ्रष्टाचार प्रकरणी तक्रारदार चाँद शेख यांचे हि उपोषण आहे.
8. शिर्डी विमानतळाला मिळाला उत्पनाचा स्तोत
विमानतळ नव्हते त्यावेळी हि मंडळी हेलिकॉप्टर ने ये जा करीत होते,त्याची जागा ता येणाऱ्या चार्टर प्लॅन ने घेतली आहे,येथे येणाऱ्या चार्टर प्लॅन २ ते १४ आसनक्षमतेने छोट्या विमानाचा समावेश आहे.त्यातून विमानतळाला उत्पन्नच नवास्रोत मिळाला आहे.
9. जनावरे नेणारा टेम्पो अडवणे पडला महागात
शहरात जनावरे घेऊन जाणारे दोन टेम्पो काही कार्यकर्त्यांनी अडविले व पोलीस ठाण्यात नेले. मात्र हा प्रकार कार्यकर्त्यांच्या चांगलाच अंगलट आलाय,हि जनावरे कत्तलखान्यात नाहींतरर ऊसतोडणी मजुरांची असल्यचे निष्पन्न झाले त्यामुळे टेम्पो अडवणाऱ्या कार्यकर्त्यावर शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
10. वाहतूक,नागरिक,व्यापाऱ्याच्या प्रश्न प्राधान्य-संभाजी गायकवाड
तालुक्याचा विस्तार आणि शहराची लोकसंख्या पाहता पोलीस बाळ अत्यल्प आहे.त्यासाठी जोपर्यंत व्यापारी नागरिक पुढे होऊन पोलीस प्रशासनाला मदत करत नाहीत तोपर्यंत ठोस पावले उचलता येत नाहीत असाही ते म्हणाले
No comments
Post a Comment