Breaking News

1/breakingnews/recent

22 डिसेंबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

   News24सह्याद्री -  बँकांना तीन दिवस सुट्टी....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा



TOP HEADLINES


1. ‘एम्स’च्या संचालकांनी दिला सर्तकेचा सल्ला
भारताने ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली असून, आणखी एक समाधानाची बाब म्हणजे करोनाच्या नव्या प्रकाराचा एकही रुग्ण देशात अजूनही आढळलेला नाही, मात्र चिंता कमी झालेली नाही. एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.  

2. कुटुंबीयांच्या विनवणीनंतर अखेर दहशतवाद्यांची शरणागती
सैन्य आणि दहशतवाद्यांची चकमक सुरु असतानाच या दोन्ही दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना घटनास्थळी बोलवण्यात आलं. इथं दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांना विनवणी केल्यानंतर त्यांनी सैन्यापुढं शरणागती पत्करत शस्त्र टाकली.  

3. निफाडमध्ये निच्चांकी तापमानाची नोंद
निफाडचा किमान पारा घसरला आहे. 6.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची यंदाच्या थंडीच्या हंगामातील निच्चांकी नोंद निफाडमध्ये करण्यात आली आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात ही नोंद करण्यात आली आहे  

4. राज्यमंत्री बच्चू कडूंना नागपुरातच रोखलं
 बच्चू कडू थांबलेल्या विश्रामगृहाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी 9 वाजता विमानाने बच्चू कडू मुंबईला रवाना होणार होते. पण पोलिसांनी त्यांना विश्रामगृहाच्या दारातच अडवून धरलं. 

5. मोदींच्या भक्तीवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित करु नये
“दिल्लीतील रकीबगंज गुरुद्वारात पंतप्रधान मोदी अचानक गेले. गुरू तेगबहादूर यांच्या समाधीपुढे त्यांनी माथे टेकवले. यात अस्वस्थ होण्यासारखे काय आहे? मोदी यांनी कोणतीही कृती केली तरी ते नाटक किंवा ढोंगच आहे, असे मानून विरोधक टीका करतात. हे काही योग्य नाही”, असं संजय राऊत म्हणाले

6. पहिल्या टप्प्यात २० हजार डोस
 अधिकारी,डॉक्टर्स, कर्मचारी, परिचारिका, आशा व अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच शहरातील खासगी आरोग्यसेवेशी निगडित कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आज प्रत्यक्ष लसीकरणासाठी सहभागी होणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मंगळवारी प्रशिक्षण दिले जाणार आहे

7. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा 
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने विद्यार्थ्यांना आरक्षणाअंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील ८ विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला.

8. दहावीच्या विद्यार्थ्यांना घरपोच मिळणार मार्कशीट
दहावीची मार्कशीट मिळवण्यासाठी आता धावपळ करावी लागणार नाही. विद्यार्थ्यांना मार्कशीट घरपोच देण्याची सोय परीक्षा मंडळाने केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता दहावीची मार्कशीट घरीच मिळणार आहे. कोणत्याही व्यक्तीला यापुढे चार वेळा ऑनलाईन मार्कशीट मागविता येणार आहे.

9. बँकांना तीन दिवस सुट्टी 
ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी येणारा शनिवार हा ‘फोर्थ सॅटर्डे’ आहे. त्यामुळेच 26 डिसेंबरलाही बँका बंद असतील. तर 27 डिसेंबरला रविवारच्या साप्ताहिक सुट्टीमुळे बँका उघडणार नाहीत. अशाप्रकारे या आठवड्यात सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असेल.

10. पृथ्वी शॉच्या जागी लोकेश राहुलला संधी द्या - सुनिल गावसकर
२६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी पृथ्वी शॉला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार सुनिल गावसकर यांनी लोकेश राहुलला पृथ्वी शॉच्या जागेवर भारतीय संघात स्थान देण्याची मागणी केली आहे.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *