31 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - गंगापूर तहसील कार्यालयात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. 2 जानेवारीपासून सर्व राज्यांत कोरोना लसीच 'ड्राय रन'
सर्व राज्यांच्या राजधानीमध्ये कमीत कमी तीन सेशन साईटवर याची आखणी करण्यात येणार आहे. अतिशय दूरवरच्या भागात असणाऱ्या राज्यांचाही या ड्राय रनमध्ये समावेश असेल.२ जानेवारीपासून अतिशय मोठ्या स्तरावर देश कोरोना लसीकरणाच्या उपक्रमात महत्त्वाचं पाऊल टाकणार आहे.
2. फास्टॅग लावण्याची मुदत दीड महिन्यांनी वाढवली
केंद्र सरकारने टोलनाक्यावर टोल वसुली सोपी आणि सुरक्षित बनवण्यासोबतच वाहतूक कोंडीतू मुक्तता व्हावी यासाठी चारचाकी वाहनांनासाठी 1 जानेवारीपासून फास्टॅग अनिवार्य केलं होतं. परंतु वाहचनालकांना फास्टॅग मिळण्यात येणाऱ्या अडचणी पाहता केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवली आहे.
3. भारत जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबवणार- नरेंद्र मोदी
लसीकरणाची तयारी सध्या शेवटच्या टप्प्यात असून लोकांना भारतात निर्मिती झालेल्या लसीचा डोस मिळेल असंही नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. गुजरातमधील राजकोटमध्ये एम्स रुग्णालयाच्या भूमीपूजनावेळी ते बोलत होते.
4. गोव्यात 40 ते 45 लाख पर्यटक दाखल
सध्याच्या माहितीनुसार, गोव्यात थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी 40 ते 45 लाख पर्यटक दाखल झाले आहेत. गोव्यातील बागा, कलंगुट, मिरामार हे सर्व समुद्रकिनारे हाऊसफुल्ल झाले आहेत.
5. रिलायन्स जिओचा मोठा धमाका
जिओ पुन्हा एकदा 1 जानेवारी 2021 पासून सर्व ऑफलाइन कॉल फ्री करत आहे."कंपनीच्या या निर्णयानंतर 1 जानेवारीपासून रिलायन्स जिओच्या वापरकर्त्यांना व्हॉईस कॉलसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत
6. तीन महिन्याचा पगार शहीद जवानाच्या कुटुंबाला - खासदार नवनीत राणा
आताही त्यांनी असाच एक मोलाचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्याचा पगार शहीद जवानाच्या कुटुंबाला आणि त्यानंतरचा हा पगार शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणा नवनीत राणा यांनी केली आहे.
7. रायगड ग्रामपंचायतीवर भगवा फडकला
ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असल्याचे निश्चित मानले जात आहे. यावेळी बिनविरोध निवडून आलेले सर्व सदस्य यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील यांची भेट घेतली. यावेळी बबनदादा पाटील यांनी या सर्व सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
8. एल्गार परिषद होणारच- बी जी कोळसे पाटील
आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्य सरकारने सभागृहात परवानगी दिली नाही तर एल्गार परिषद रस्त्यावर घेऊ, असे बी.जी. कोळसे-पाटील यांनी सांगितले.
9. थर्टी फर्स्टच्या रात्री ऑनलाईन फूड डिलिव्हरीची वेळ वाढवली
इंडियन हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनने यासंदर्भात पालिकेला विनंती करण्यात आली होती. पालिकेने ही विनंती मान्य केल्याने नाईट कर्फ्यूच्या निर्णयामुळे नाराज असलेल्या हॉटेल व्यावसायिकांना काहीप्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
10. गंगापूर तहसील कार्यालयात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा
तालुक्यात कोरोनाचा फैलाव होणार असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. त्यामुळे covid-19 चे सर्व नियम पाळून उमेदवाराचे अर्ज स्वीकारून या नियमाचे पालन न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनी विरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे
No comments
Post a Comment