स्पेशल रिपोर्ट - साई दरबारी उसळली गर्दी
News24सह्याद्री - साई दरबारी उसळली गर्दी...पहा सह्याद्री special रिपोर्ट
३१ डिसेंबर, वर्षाच्या अखेरीस सरत्या वर्षाला निरोप देताना देवदर्शनाचा संकल्प घेऊन भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने शिर्डीमध्ये हजेरी लावली. देशाच्या कानाकोपऱ्यातून आज भाविक मंडळी शिर्डीत दाखल झाली आहेत, दरम्यान ज्या भाविकांकडे पास आहेत अशा भाविकांनाच मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येत आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे केले जावे याची दक्षता साई संथान प्रशासनाने घेतली आहे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनीही साई दरबारात हजेरी लावून दर्शन घेतले. त्यांच्याशी देशभरातील कानाकोपऱ्यातून अनेक पालख्याही साई दरबारी दाखल झाल्याचं वृत्त आहे.
तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई सनाथनने साई दरबार आकर्षक फुलांसहित विद्युत रोषणाईने सजवल्याचे चित्र सध्या शिर्डीत दिसत आहे. भाविक भक्तांनी ह्या सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात देणगी दिल्याचे वृत्त आहे. कर्नाटक राज्याचे नगरविकासमंत्री बी. एस. बसवराज यांनीही साई मंदिर परिसर सजावटीसाठी मोठी देणगी दिल्याचे समजते. आज रात्रभर साई समाधी मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे, मात्र मध्यरात्री ११.२५ ते ११.५५ या वेळेत साफ सफाई करणेसाठी मंदिर बंद राहील.अशी माहिती शिर्डी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कान्हुराज बघाटे यांनी दिली.
No comments
Post a Comment