Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई

No comments

      News24सह्याद्री - सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई...पहा जिल्ह्याची खबरबात




TOP HEADLINES


1. सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई  
अजूनही मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, भव्य सभा संमेलने यांना अद्यापही मनाई करण्यात आली आहे.  त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

2. ग्रामपंचायत निवडणूक ; सात हजार 134 जागांसाठी  तब्बल 15 हजार अर्ज दाखल 
  दाखल झालेल्या अर्जांच्या छननीचे  काम आज दिवसभर सुरु होते ,येत्या  चार जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे . 

3. माजी मंत्र्यांच्या टीकेला रोहित पवारांचे प्रत्युत्तर
राम शिंदे यांच्या या टीकेवर पवारांनी प्रत्युत्तर देत निशाणा साधला आहे. त्यांना विकासाचं काम कळत नसेल, गट-तट कळत असेल तर त्याला मी काही करु शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.

4. रोजगार हमी योजने अंतर्गत सुरु असणाऱ्या कामांची डॉ चिखले  यांच्याकडून पाहणी 
तालुक्यातील चौंडी, पिंपरखेड येथील कामांची पाहणी करताना फळबागा, शेततळी,तसेच  शेतकऱ्यांनी शेततळ्यात सोडलेले मासे  पाहून समाधान व्यक्त केले.  यावेळी तालुका कृषी अधिकारी सुरेश शिंदे,कृषी सहाय्यक बोंदाडे,कृषीपर्यवेक्षक कदम,शिंदे व शेतकरी उपस्थित होते.

5. शेवगाव तालुक्यात  मोठ्या प्रमाणात  ऊस लागवड   
यंदा तालुक्यातील अनेक भागात इतर पीक लागवडीच्या तुलनेत उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे   तर उसाच उत्पादनही चांगलं मिळत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातवरण दिसतंय . 

6. कोपरगाव शहरात सीसीटीव्ही लावण्याची मागणी 
कोपरगाव शहारातील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत असल्याने समाजकंटकांकडून करण्यात येत असलेल्या कुरापतींना पायबंद घालण्यासाठी पालिकेने लवकरात लवकर सीसीटीवीचा प्रश्न निकाली काढावा अस वर्पे यांनी निवेदनात  म्हटलंय . 

7. पठारी भागात गुन्हेगारीचा उच्चांक 
वर्षात  मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली , खून , बलात्कार,  विनयभंग , घरफोड्या आदी प्रकारच्या गुन्ह्यांची मोठ्या प्रमाणात नोंद झाल्याचे  अहवालातून स्पष्ट झाले आहे , यासह वर्षभरात  महामार्गाच्या दुरवस्थेमुळे छोट्या-मोठ्या अपघातांमध्ये जवळपास 9 जणांना नाहक जीव गमवावा लागला. 

8. स्विफ्ट कारने अचानक पेट घेतला 
 पोलीस व अग्निशमन गाडी अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाली , शर्थीच्या प्रयत्नांनंतर  गाडीला लागलेली आग आटोक्‍यात आली यामुळे मोठी जीवित हानी टळली, मात्र  गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

9. शिर्डीत पोलिसांचा  फौजफाटा  तैनात 
 शिर्डीत येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात असून प्रत्येकाच्या हालचालींवर पोलिसांची  करडी नजर असल्याचा पहायला  मिळत आहे . शिर्डीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांसह स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे 
 
10. पोस्ट ऑफिस मागील जागेत भाजी विक्रेते व्यापाऱ्यांना बसू देऊ नये 
 भाजीचा व्यवसाय थाटू लागल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे , दरम्यान प्रशासनाने  शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यापाऱ्यांना व भाजी विक्रेत्यांना व्यवसाय करू देऊ नये अशी मागणी केली जात आहे . 





No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *