30 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - ठाकरे सरकारसोबत काँग्रेसचा खळखट्याक होणार - रामदास आठवले...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
केंद्र सरकारने केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील अननस उत्पादक शेतकऱ्यांनी आपण या संघर्षात आंदोलक शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे दाखवण्यासाठी हा ट्रक पाठवल्याचे समजते. सध्या या केरळमधील शेतकऱ्यांवर त्यांनी केलेल्या या कामासाठी कौतुकाचा वर्षाव होत आहे.
2. शरद पवारांनी शेतकऱ्यांना दिली हमी
सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. ३० डिसेंबर अर्थात उद्या पुन्हा एकदा सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आंदोलक शेतकऱ्यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांची भेट घेतली.
3. भुजबळ, वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा - मराठा संघटना
4. मुंबई महापालिकेत काँग्रेस विरोधी पक्षात
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. माझी मुंबई, माझी काँग्रेस हा काँग्रेसचा नारा आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याबाबत आम्ही का बोलू नये? असा सवाल मुंबई काँग्रेसने केला आहे
5. ग्रामपंचायत उमेदवारांना RTPCR चाचणी बंधनकारक
ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर उमेदवार अनेक लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिलाय.
6. ठाकरे सरकारसोबत काँग्रेसचा खळखट्याक होणार - रामदास आठवले
आठवले सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दरम्यान, औरंगाबाद येथे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर भाष्य केलं
7. मनसे कार्यकर्त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी
मनसेच्या कार्यकर्त्यांनी 25 डिसेंबरला अॅमेझॉनच्या कार्यालयावर तोडफोड केली होती. त्याबाबत गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपींना अंधेरी कोर्टात हजर केलं. तेव्हा अंधेरी कोर्टानं मनसे कार्यकर्त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
8. PNB आणि SBI बँकेकडून मालमत्तांचा लिलाव
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 30 डिसेंबरपासून लिलाव प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यामध्ये व्यावसायिक, रहिवासी आणि औद्योगिक मालमत्तांचा समावेश आहे. याशिवाय, काही घरंही लिलावासाठी उपलब्ध असतील.
9. कारच्या धडकेत काळवीटाचा मृत्यू
येलदरी रस्त्यावर भरधाव कारने काळवीटाला धडक दिल्याने गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडलेल्या काळवीटाचा जीव पञकार शेख अलीम यांन वाचवण्याचा प्रयत्न केला माञ त्याच्या डोक्यावर व तोंडावर गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. मृत काळवीटास वन विभागाच्या स्वाधीन केले.
10. भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय; कोहलीचं खास ट्विट
अजिंक्य रहाणेवर दिग्गज खेळाडू कौतुकाचा वर्षाव करत आहेत. विराट कोहलीनेही भारतीय संघाचं अभिनंदन करत अजिंक्यचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
No comments
Post a Comment