सह्याद्री ब्रेकिंग - ग्रामपंचायत निवडणूक; इच्छुक उमेदवारांना दिलासा
News24सह्याद्री -
ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवार अर्ज ऑनलाइन भरताना तांत्रिक अडचणी येत असल्याने ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचा आदेश निवडणूक आयोगाने जारी केला आहे , तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांना ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरताना अडचणी येत असल्याबाबत तक्रारी सातत्याने पुढे येत असल्याने निवडणूक आयोगाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. उद्या सायंकाळी साडेपाचपर्यंत ऑफलाईन पदतीने अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याबाबत महत्वपूर्ण माहिती नुकतीच निवडणूक आयोगाने दिली. त्यामुळे आता काहीशा प्रमाणात इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
No comments
Post a Comment