Breaking News

1/breakingnews/recent

आमच्याकडे 171 आमदार आहेत, सरकारला काहीही धोका नाही: एकनाथ शिंदे

No comments


मुंबई -

आमच्याकडे 171 आमदार असून आमचे सरकार दमदारपणे काम करत आहे.ठाकरे सरकार मार्चमध्ये कोसळणार असल्याचा भाजपचे नेते नारायण राणे यांनी केलेला दावा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला आहे.  मागेही मार्चमध्ये सरकार पडणार असल्याचं भविष्य वर्तवण्यात आलं होतं. पण या सरकारने वर्षपूर्ती पूर्ण केली असून सरकारला कोणताही धोका नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. सरकार पडेल म्हणून काही लोक पहिल्या दिवसापासून पाण्यात देव बुडवून बसले आहेत. पण आमच्याकडे 171 आमदार आहेत. सरकारला काहीही धोका नाही. गेल्यावर्षी मार्चमध्येही सरकार पडण्याचं भविष्य वर्तवण्यात आल होत. त्यानंतरही आम्ही दमदारपणे काम करत असून हे सरकार आपला कालावधी पूर्ण करेल.

 शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटीशीवरूनही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ही दुर्देवी बाब आहे. सुडाच राजकारण कोणीही करू नये, द्वेषाच हे राजकारण दीर्घकाळ टिकत नसं, असं त्यांनी सांगितलं. लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात. त्यात कोणी जिंकतो तर कोणी पराभूत होत असतो. भाजपला लोकांनी विरोधात बसवलं असून महाविकास आघाडी लोकहिताचे काम करत असल्याचंही त्यांनी सांगितले. गेल्या महिन्याभरापासून दिल्लीत शेतकऱ्यांच आंदोलन सुरू आहे. सगळ्यांचा पोशिंदा शेतकरी संकटात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे. केंद्राने दोन पावलं मागे यायला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केले.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *