Breaking News

1/breakingnews/recent

27 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट

No comments

  News24सह्याद्री -  संजय राऊताचा पुन्हा कंगनाशी पंगा...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. संजय राऊताचा पुन्हा कंगनाशी पंगा

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरात मावळत्या वर्षानिमित्त भाष्य करत अभिनेत्री कंगना राणावतवर टीकेचे बाण सोडले आहेत. त्यांनी या लेखातून महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर नेहमीच ट्विट करत टीका करणाऱ्या अभिनेत्री कंगनाचा उल्लेख राऊत यांनी 'पंगना' असा करत डिवचले आहे.

2. रोहित पवारांचे भाजप नेत्यांना ओपन चॅलेंज
दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या महिनाभरापासून आंदोलन करत आहे. तसेच त्यांचे हे आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी सरकारच्या या बैठकीत केवळ कृषी कायदा मागे घेणे आणि एमएसपी यावरच चर्चा होईल असे स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभूमीवर  राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना ओपन चॅलेंज देत म्हटले आहे की , खरंच हिंमत असेल तर राज्याच्या वाट्याचे हक्काचे #GST चे पैसे आणण्यासाठी केंद्राकडे  प्रयत्न करावेत आणि कांदा निर्यातबंदी उठवून दाखवावी आणि मगच कृषी कायद्यांच्या समर्थनाच्या बाता माराव्यात, असे चॅलेंज पवार यांनी दिले आहे.

3. सुशांत सिंह प्रकरण बाबत, देशमुख यांचा सीबीआयला सवाल
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा मुद्दा राज्यात प्रचंड गाजलाअसून, अनेक राजकीय वादविवाद बघायला मिळाले. या प्रकरणाची सुरूवातीला मुंबई पोलीस चौकशी करत होते. मात्र, नंतर त्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला असून, अद्यापही सुशांतच्या मृत्यूचे गुढ उलगडलेले नाही, याच पार्श्वभूमीवर  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सवाल उपस्थित करत म्हटले आहे की, “सीबीआयने तपास सुरू करून आता जवळपास पाच महिने झाले आहेत. पण अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची हत्या झाली की, त्याने आत्महत्या केली, याचा सीबीआयने अजून उलगडा केलेला नाही. मी सीबीआयला विनंती करतो की, त्यांनी लवकरात लवकर तपासाचे निष्कर्ष जाहीर करावेत,” असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

4. एकनाथ खडसेंबाबत भाजपचे वागणे खूनशी वृत्तीचे
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलत असताना म्हटले आहे की, सिक्वेन्स आणि टाइमिंग पाहिले तर एकनाथ खडसे हे भाजपच्या विरोधी असल्याने भाजप त्यांच्या मागे ED लावत आहेत. जे जे भाजपविरोधी आहेत त्यांच्या मागेच भाजपा ED लावत आहे. भाजप खूनशी प्रवृत्तीने वागत आहे. खुनशी प्रवृत्तीने मागे लागणे हे यापूर्वी भारतात होत नव्हत ते आता होताना दिसत आहे. परंतु खडसे पूर्ण निर्दोष आहेत त्यांच्याकडून कोणतीही चूक झालेली नाही आणि आम्हाला चौकशीचे कोणतेही भय वाटत नाही, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली आहे.

5. पार्थ पवारांविषयी मत मांडत रोहित पवार म्हणाले ....
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. पार्थ पवार यांना पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात असून, पार्थ पवार आमदरकीची निवडणूक लढवणार का? असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार याना विचारला असता , यावर प्रतिक्रिया देत पवार यांनी म्हटले आहे की, पार्थ पवार यांना उमदेवारी द्यायची की नाही, याबाबत शरद पवार साहेब, अजितदा आणि तिथले पालकमंत्री निर्णय घेतील. कार्यकर्ते बोलून जातात पण निर्णय नेते घेत असतात. योग्य तो न्याय तिथे असलेल्या लोकांना दिला जाईल, असा विश्वास रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

6. इंग्लंडवरुन आलेल्या प्रवाशांच्या विशेष सर्वेक्षणात 16 जण कोरोनाबाधित, राज्य सरकार सतर्क


7. विशेष प्रकरणांच्या साक्षीदारांना धमकावणारं रॅकेट उघड; मुंबईत एटीएसच्या कारवाईत हेड कॉन्स्टेबलही ताब्यात


8. 31 डिसेंबरला संचारबंदीची अट शिथिल करा, मनसेची राज्य सरकारकडे मागणी


9. सलमान खानचा 55 वा वाढदिवस, पनवेलच्या फार्महाऊसवर सेलिब्रेशन

10. शेतकरी संघटना 29 डिसेंबर रोजी सरकारसोबत चर्चेस तयार, काही अटी ठेवल्या


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *