Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - महिलेची गाय चोरल्या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

No comments

 News24सह्याद्री महिलेची गाय चोरल्या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल....पहा शहराची खबरबात


TOP HEADLINES


1. महिलेची गाय चोरल्या  प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

शहरातील वाकुडी रस्त्यावरील भवानी नगर येथून महिलेची पंचवीस हजार रुपये किमतीची गाय चोरून नेल्या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी अरुण शिवाजी मोडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी प्रवीण फुलसौंदर रवी रंगनाथ फुलसौंदर व दत्तात्रय उर्फ अण्णा फुलसौंदर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी हेडकॉन्स्टेबल ढगे हे पुढील तपास करत आहेत
===============
2. मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण द्यावे
महाराष्ट्रात मुस्लिम समाजाची राजकीय सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती अतिमागास झालेली आहे त्यांना प्रगतीच्या कक्षेत आणण्यासाठी मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण द्यावे  अशी मागणी मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलनातर्फे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
===============  
3. सवेडीत भरदिवसा चोरी
सावेडी उपनगरातील धर्माधिकारी मळ्यातील एका घरामधील व्यक्तीची नजर चुकवून कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एक लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविणायत आला अरविंद कुमार लक्ष्मीनारायण सोमनि  यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात  अज्ञात चोरट्यान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
===============    
 4MPSC - UPSC च्या  प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी  
 गेल्या अनेक वर्षांपासून पोलिस भरती, बँक भरती, MPSC - UPSC च्या सर्वच प्रवेश प्रक्रिया थांबलेली आहे, ती लवकरात लवकर सुरू करावी. लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. सरकारी अनास्थेमुळे परीक्षेची अनिश्चितता आहे. या सर्व कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा देखील संपली आहे. काही दिवसांपूर्वी परीक्षांचे ऑनलाइन फॉर्म भरून घेतले आहेत त्याचे देखील पुढे काहीच झालेलं नाही. त्यामुळे सरकारने आरक्षणाचा विषय मार्गी लावून सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. पोलिस भरती, MPSC परीक्षांच्या प्रक्रिया व तारखा लवकरातलवकर जाहीर कराव्यात. अशी मागणी मातोश्री प्रतिष्ठानचे दिपक कावळे पाटील यांनी आज  मदत व पुनर्वसन मंत्री  विजय वडेट्टीवार यांच्याकडे  केली. यावेळी आनंद लहामगे आणि मातोश्री प्रतिष्ठानचे इतर सदस्य उपस्थित
==============  

5. बुथ हॉस्पीटलची कोरोना काळातील रुग्णसेवा सदैव स्मरणात राहील : नगरसेवक गणेश भोसले
समाजावर ज्या ज्या वेळी महामारीची संकटे आली त्या त्या वेळी रुग्णसेवेचे व्रत घेतलेल्या बुथ हॉस्पिटलने रुग्णांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहुन रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवनदानाचे महान कार्य केले आहे. जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना विषाणू काळात बुथ हॉस्पीटलने केलेली रुग्णसेवा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहीली जाऊन सदैव स्मरणात राहिल असे गौरवोदगार नगरसेवक गणेश भोसले यांनी काढले.
  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *