Breaking News

1/breakingnews/recent

स्पेशल रिपोर्ट - गुडबाय २०२०, वेलकम २०२१; नैराश्याच्या अंधारात आशेचा किरण

No comments

         News24सह्याद्री - गुडबाय २०२०, वेलकम २०२१; नैराश्याच्या अंधारात आशेचा किरण...पहा सह्याद्री special रिपोर्ट



आज ३१ डिसेम्बर अर्थात २०२० ह्या वर्षाला निरोप देण्याचा दिवस. सरते वर्ष कसे गेले हे एकदा वळून पाहूया.. आजच्या या स्पेशल रिपोर्ट मधून २०१९ च्या ३१ डिसेंबरला मोठ्या जल्लोषात निरोप देत, सर्व भारतीयांनी ट्वेन्टी ट्वेन्टी चे स्वागत केले. जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न डोळ्यांत साठवून नव्या वर्षाच्या नव्या पहाटेला बाहू पसरवून आलिंगन दिले. कुणी कल्पनाही केली नव्हती कि, चीनमध्ये जन्माला आलेला कोरोना नावाचा व्हायरस जगाला २०२० या पूर्ण वर्षभरासाठी कड्या कुलुपांत बंद करण्यासाठी बाहेर पडला आहे. जो आलिंगन तर सोडा, वर्षभर कोणाशी हस्तांदोलन देखील करू देणार नाही. अकल्पित पणे अवतरलेल्या कोरोनाने जगाला व्हायरस, पँडेमिक, हर्ड इम्युनिटी, क्वारंटाईन-आयसोलेशन, लॉकडाऊन-अनलॉक, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, सोशल डिस्टंसिंग, वर्क फ्रॉम होम, सॅनीटायझेशन, कन्टेन्मेंट झोन अशा अनेक शब्दांशी चिरपरिचित केले.

अनेक अडचणी, निराशा यांनी भरलेलं हे वर्ष ठरणार यात दुमत असण्याचे काहीच कारण नाही, परंतु आशावादी असणाऱ्या लोकांनी यातूनही काही चांगल्या गोष्टींची नोंद घेतली. अनेक अर्थांनी 2020 हे वर्ष आव्हानात्मक राहिले. पण या वर्षात महिलांच राजकारणातलं प्रतिनिधीत्व वाढलं. महिलेकडून नेतृत्व केलं जात असलेल्या देशांची संख्या यावर्षी वाढली.संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार संसदेत महिलांचं प्रतिनिधीत्व २०२० मध्ये वाढलं आहे. कमला हॅरीस अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदापर्यंत पोहोचणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय दक्षिण आशियाई महिला ठरल्या.जगभरात वांशिक भेदभावाविरुद्ध आंदोलनं झाली. जगाने यामध्ये सहभाग नोंदवला, ही भविष्यासाठी सकारात्मक बाब आहे. नासाने ऑक्टोबर महिन्यात चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाणी उपलब्ध असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे भविष्यातील मोहिमांना मदत मिळू शकते.पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून अनेक कंपन्यांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं आश्वासन दिलं. ह्याच काळात प्रदूषण कमी होऊन, ओझोन वायूचा स्तर सुधारल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले. कोव्हिड साथीने आपल्याला दिलेली सर्वांत महत्वाची शिकवण म्हणजे स्वच्छता.

आता लोक स्वच्छतेविषयी अधिक जागृत झालेले दिसून येतात, हे विशेष मात्र याउलट दुःखद बाब  २०२० मध्ये अनेकांनी आपली नोकरी गमावली. जगभरातील लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. चित्रपट प्रदर्शनासाठी थिएटर बंद असताना ओटीटी प्लॅटफॉर्म चा नवा पर्याय देखील समोर आला.अशा प्रकारे हे सरते वर्ष हरप्रकारे एक दु:स्वप्नच ठरले आहे. एक असा अनुभव ज्याची पुनरावृत्ती कुणालाही नको असेल.आता येणाऱ्या २०२१ ह्या वर्षात सर्व शुभ आणि मंगल व्हावे ह्या शुभेच्छा देवू


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *