31 डिसेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - पेण येथे तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने पुन्हा प्रलंबित ठेवले. या अर्जाबाबत समितीची १ जानेवारीला पुन्हा बैठक होणार आहे. त्यामुळे करोनावरील लशीसाठी भारतीयांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
2. कृषी कायदे रद्द करण्याच्या मुद्यावर तिढा कायम
नवे कायदे रद्द न करण्याचा निर्धार केंद्राने कायम ठेवला. कायदे करण्याच्या प्रक्रियेप्रमाणे ते मागे घेण्याची प्रक्रियाही प्रदीर्घ असते, असे केंद्राकडून शेतकरी नेत्यांना स्पष्ट करण्यात आले
3. उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजधानी दिल्ली आणि राजस्थानसह इतर राज्यांमध्येही तापमान घसरले असून अजून काही दिवस ही लाट कायम राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. अनेक ठिकाणी दाट धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
4. धनखार यांना राज्यपालपदावरून हटवा!
राज्य प्रशासन आणि सरकारविरुद्ध सातत्याने जाहीर वक्तव्ये करून धनखार यांनी आपल्या घटनात्मक मर्यादेचे उल्लंघन केले असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.
5. पेण येथे तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या
आदिवासी समाज आणि सामाजिक कार्यकर्त्यांंनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी गुन्ह्यची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी आणि रोहा तांबडी येथील प्रकरणाप्रमाणे याही गुन्ह्यत विशेष सरकारी वकीलांची नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणी केली आहे.6. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत कोणताही एकतर्फी बदल अस्वीकारार्हसंरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत कोणताही एकतर्फी बदल भारत स्वीकारणार नाही. लडाखमधील तिढा चर्चेद्वारेच सुटेल, अशी आशाही संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली.
7. मिळकत धारकाच्या प्राँर्पटीची माहिती वेबसाईटवर उपलब्ध
उल्हासनगरातील10 हजार,595 मिळकत धारकांंचे प्राँर्पटी कार्ड वेबसाईटवर उपलब्ध असुन उर्वरित सर्व मिळकत धारकांचे प्राँर्पटी कार्ड मार्च 2021पर्यंत वेबसाईटवर उपलब्ध करून देणार असल्याचे जयसिंग राठोड यांनी सांगितले.या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन नगर भुमापन अधिकारी जयसिंग राठोड यांनी येथील जनतेला केले आहे.
8. ३१ डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर चौकाचौकात नाकाबंदी
संचारबंदी मोडणाऱ्यावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर असणार आहे कल्याण झोन मध्ये ४ ड्रोन सज्ज असून संध्याकाळ नंतर हे कॅमेरे शहरावर लक्ष ठेवणार असल्याने नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करू नये असे आवाहन पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी केले आहे
9. छळाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या
प्रकरणी मंदाकीनीचे वडील संजय तात्याराव तिखे यांच्या फीर्यादिवरुन शिल्लेगांव पोलीस ठाण्यात मारहाण करून शारीरिक मानसीक छळ करत मरणास कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
10. पालघर जिल्ह्य़ात हेल्मेट सक्तीचे
रस्ता सुरक्षा पंधरवडानिमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांनी अलीकडेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षेविषयी पायंडा पडावा या दृष्टीने हेल्मेट सक्ती निर्णयाची अंमलबजावणी शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी योजिले आहे.
No comments
Post a Comment