Breaking News

1/breakingnews/recent

औरंगाबादचे नामाकरण करण्यास विरोध, शिवसेना विरुद्ध काँग्रेस नवा वाद रंगण्याची चिन्हे

No comments


 मुंबई -

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नामकरणाच्या मुद्याला तोंड फुटले आहे. शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पण शिवसेनेने औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे. दुसरीकडे औरंगाबाद दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादचे नामाकरण करण्याचस विरोध दर्शवला आहे. औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर होऊ देणार नाही, आमच्या त्याला विरोध असेल,असे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. बाळासाहेब थोरात यांनी थेट विरोधात भूमिका मांडल्यामुळे औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्यावरून शिवसेना विरुद्ध काँग्रेस नवा वाद रंगण्याची चिन्हे आहे.

24 डिसेंबर रोजी मनसेने शहरात औरंगाबादच्या नामाकरणाबद्दल ठिकठिकाणी पोस्टर्स लावली होती. 'प्रजासत्ताक दिनापर्यंत औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करा नाहीतर असे बॅनर मनसेकडून ठिकठिकाणी लावण्यात आले होते. त्यावरून सेना आणि मनसेमध्ये वाद पेटला होता. मनसेच्या मागणीला परिवहन मंत्री अनिल परब यांनी टोलावून लावले होते. औरंगाबाद शहरातील मनसेची बॅनरबाजी ही निवडणुकीच्या तोंडावर सुरु आहे. मनसेच्या होर्डिंगवर 'नाहीतर' असं लिहिलेले आहे. असे अनेक 'नाहीतर' आम्ही पाहिले आहेत. अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही, असा टोला अनिल परब यांनी लगावला होता. तसंच 'संभाजीनगर' हे नाव आमच्या हृदयात आहे. आम्ही नेहमीच संभाजीनगर म्हणतो, असंही परब म्हणाले होते.









No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *