मोठी बातमी - रेखा जरे हत्याकांड: प्रेमात काटा काढून चितेवर अग्नीडाग देईपर्यंत थांबला होता बाळ बोठे
News24सह्याद्री -
रेखा जरे यांच्या अंत्यविधीसाठी नगरच्या अमरधाममध्ये बोठे याने हजेरी लावली होती. रेखा जरे आणि बाळ बोठे यांच्यातील संबंध लपून राहिलेले नाहीत. जरे यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढवून त्यांच्या माध्यमातून बोठे याने नक्की काय काय केले याचे पुरावेच आता पोलिसांसमोर येऊ लागले आहेत. रेखा जरे यांचे हत्याकांड झाल्यानंतर नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणि पोस्ट मार्टेम करताना बाळ बोठे जरे यांच्या मृतदेहाजवळ थांबून होता. जरे यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी अमरधाममध्ये आणले गेले. त्यावेळीही तो तेथे हजर होता. जरे यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार चालू असताना जरे बाजूलाच उभा राहून अश्रू ढाळत होता. अर्थात त्याचे हे अश्रू नाटकी होते हे नंतर उघड झाले. जरे यांना थेट चितेवर ठेवून अंतिम संस्काराच्या क्षणापर्यंत थांबलेला बोठे खुपच दु:खात असल्याचे वरकरणी दाखवत राहिला.
तसेच, जरे यांचे मुले आणि नातेवाईक अंतिम संस्कार केल्यानंतर घरी आल्यानंतर बाळ बोठे हा देखील जरे यांच्या घरी आला होता. जरे यांच्या मोठ्या मुलाच्या म्हणजेच रुणाल जरे याच्या गळ्यात पडून बोठे हंबरडा फोडून रडल्याची माहिती समोर आली आहे. आईचा मर्डर झाल्याच्या धक्क्यात रुणाल जरे होता तरीही तो बोठे यास सावरत होता. कसलेल्या अभिनेत्यासारखा अभिनय बाळ बोठे याने हत्याकांड झाल्याच्या क्षणापासून ते अंत्यसंस्कारापर्यंत केले आहे.
No comments
Post a Comment