Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - जरे हत्याकांड : कहानी मे ट्वीस्ट! विजयमाला माने होत्या बोठेच्या खबरी

No comments

  News24सह्याद्री - 


नगरमधील सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मोठे ट्वीस्ट समोर आले आहे. जरे यांचे हत्याकांड सुपारी देऊन बाळ बोठे याने घडवून आणले आहे. बाळ बोठे आता फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, याच घटनेची प्रत्यक्ष साक्षीदार असणारी आणखी एक व्यक्ती फरार झाली आहे.रेखा जरे यांच्यासोबत पुण्याला आणि पुण्याहून नगरला येत असताना सोबत असणार्‍या विजयमाला माने या पसार झाल्या आहेत. विजयमाला माने यांचा या घटनेत जबाब नोंदविणे आवश्यक असल्याने पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. त्यांचा मोबाईल बंद आहे. घटनेच्या रात्रीच म्हणजेच जरे यांच्यावर अंत्यसंस्कार होण्याच्या आधीच माने यांनी पळ काढला आहे.

विजयमाला माने या नगरमध्ये जिल्हा महिला बालविकास अधिकारी म्हणून काम करत होत्या. आता सध्या त्या नगर शहरातील एकात्मीक बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून काम करत आहेत. त्या मुळच्या सांगलीतील रहिवाशी आहेत . त्यांचे  पती आरोग्य सेवेत अधिकारी आहेत. हे दोघेही सध्या विभक्त राहतात. ऐकमेकांच्या विरोधात या दोघांनी पोलिस ठाण्यात तक्रारीही केलेल्या आहेत.

जरे यांचे हत्याकांड करणारा बाळ बोठे याने या विजयमाला माने यांना बहिण मानले आहे. अर्थात बोठे याने अशा अनेक महिलांना बहिण मानले होते. माने यांचे कॉल डिटेल्स पोलिसांना मिळाले आहेत. माने या सध्या बाळ बोठे याच्या घरापासून हाकेच्या अंतरावर राहतात. रेखा जरे यांच्यासोबत त्या सावलीसारख्या राहत होत्या. रेखा जरे कोठे जातात, कोणाला भेटतात, सोबत कोण असते, काय बोलतात, त्यांना कोणाचे फोन येतात, फोनवर त्या काय बोलतात याची माहिती बोठे यांना देत होत्या. बोठे याने या कामासाठी विजयमाला माने यांची नियुक्ती केली होती असं म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. करंजी घाटात मोटार अपघात झाल्याचे भासवून जरे यांचे हत्याकांड करण्याचा डाव फसला. त्यावेळीही याच माने रेखा जरे यांच्यासोबत होत्या हे विशेष! त्यावेळी जर डाव यशस्वी झाला असता तर जरे यांच्या जोडीने माने यांचेही बरेवाईट झाले असते.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *