Breaking News

1/breakingnews/recent

लाज नावाची गोष्ट शिल्लक राहिलीये का पाहा : निलेश राणे

No comments

  News24सह्याद्री -  


मुंबई - 

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर, पुणे, औरंगाबाद या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहावे लागले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. मात्र त्याचवेळी त्यांनी भाजपाचाही खास आपल्या शैलीत समाचार घेतला होता. यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.

राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधत म्हटले आहे की, “वाह अजित दादा वाह!! एका वर्षापूर्वी ज्यांना चपराक बसली म्हणताय त्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ तुम्ही घेतली हे विसरलात?? कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का?,” असे म्हणत राणे यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *