Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर कारवाई करतील

No comments

   News24सह्याद्री -




कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडून गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. सरकारने या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. समुद्रकिनारे, उद्याने तसंच रस्त्यावर जाऊ नये असं या मार्गदर्शक सूचनांत म्हटलं आहे. महत्वाचं म्हणजे राज्य सरकारने लागू केलेला नाईट कर्फ्यू हा ३१ जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे.    

काय आहे नववर्षासाठीची राज्य सरकारची नियमावली
१. कोरोनाची परिस्थिती पाहता नव्या वर्षाचं स्वागत घरातच करावं.
२. 31 डिसेंबरला नागरिकांनी समुद्रकिनारे, उद्याने विशेषत: मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी सोबतच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये
३. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. सोबतच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा.
४. विशेषत:  ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिक आणि 10 वर्षाखालील मुलांनी घराबाहेर पडणं टाळावं.
५. 31 डिसेंबरला कोणत्याही धार्मिक अथवा सांकृतिक कार्यक्रमांचं आयोजन करु नये.
६. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी धार्मिक स्थळी भाविकांची मोठी गर्दी होते. यंदा ती गर्दी टाळावी - नववर्षाच्या स्वागतासाठी यंदा आतिषबाजी टाळा, नियमांचं सक्तीने पालन करा
७. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर कारवाई करतील.
८. नाईट कर्फ्यू रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत जारी असेल.
31 डिसेंबरच्या रात्री हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब्ज रात्री 11 वाजेपर्यंतच खुली ठेवण्याची परवानगी आहे. 11 वाजल्यानंतर हॉटेल्स, रेस्टॉरंट इत्यादी ठिकाणी नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे घरी रहा सुरक्षित रहा सरकारने लागू केलेल्या नियमांचं पालन करा

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *