'थर्टीफर्स्ट'साठी गृहमंत्र्यांनी दिलेल्या सूचना वाचा
मुंबई -
ब्रिटनमध्ये असलेल्या नवीन कोरोना आता हळूहळू सगळीडे पसरतो आहे.जगावर असलेले कोरोनाचे संकट टळण्याकडे लक्ष लागले असतानाच नव्या कोरोना अवताराच सावट गडद होऊ लागले आहे. भारतात मंगळवारी कोरोनाच्या नव्या विषाणूंची लागण झालेले काही रुग्ण आढळले. यामुळे खबरदारी घेतली जात आहे. १ जानेवारी २०२१पासून हळूहळू सारे पूर्वपदावर येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत असतानाच राज्यात ३१ जानेवारीपर्यंत ‘मिशन बिगीन अगेन’ लागू राहील असे जाहीर करण्यात आले आहे. याचसोबत ‘थर्टीफर्स्ट’च्या आणि नववर्षाच्या स्वागताची तयारी करणाऱ्यांनाही काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहे.
त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत शांततेने व साधेपणाने करा. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी रात्री ११ वाजेपर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार खुले राहणार आहे. मात्र रात्री ११ वाजल्यानंतर हे सर्व बंद होणार आहे. याचाच अर्थ घराबाहेर जावून औषधे, जेवण, मित्राकडे जाणे यावर बंधन नाही. परंतु सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर बंधने असणार आहे. त्यामुळे जनतेने राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन करावे”, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यतील जनतेला दिल्या आहे.

No comments
Post a Comment