30 डिसेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - ग्रामपंचायतीच्या निवडणूक अर्जासाठीचा मुदत वाढवून देण्याची मागणी...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. राज्यात नव्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही; पण, काळजी घ्या: राजेश टोपे
देशात नव्या कोरोनाचा संसर्ग झालेले काही रुग्ण सापडले आहेत. पण महाराष्ट्रात अजूनतरी नव्या कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडलेला नाही. महाराष्ट्रात कोणीही इन्फिल्टेड झालेलं आढळलेलं नाही. पण आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहोत, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
2. विशेष पार्टी करणाऱ्यांवर होणार कारवाई,एसपींची माहिती
ग्रामीण भागात असणाऱ्या फॉर्म हॉउससह हॉटेलवर रात्रभर धिंगाना चालु नये, यासाठी पोलिसांकडून सर्च ऑपरेशन हाती घेण्यात येणार आहेय..तसेच ड्रोन कॅमेराद्वारे परिसराची पाहणी करण्यात येणारेय..पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची विशेष माहिती.
3. खंडणीखोर दाम्पत्याच्या घरावर पोलिसांचा छापा
महिनाभर उलटूनही हे चौघे पोलिसांच्या हाती लागत नव्हते.आज या प्रकरणातील मुख्य सूत्रधार विद्या म्हात्रे व विश्वनाथ म्हात्रे हे दोघे घरी असल्याची माहिती विष्णू नगर पोलिसांना मिळताच त्यांनी घरावर छापा टाकत या दोघाना अटक केली .या प्रकरणी त्यांचे दोन फरार साथीदार सुनील म्हात्रे, एकनाथ म्हात्रे यांचा शोध पोलीस घेत आहेत.
4. एम आय एम वतीने स्वस्त धान्य दुकानावर कारवाई ची मागणी
शासनाने गोरगरिबांसाठी दिलेल्या डाळीवर डल्ला मारणाऱ्या या दुकानदारांची चौकशी करून दुकानदारांनी स्वतःच्या फायद्यासाठी घरात ठेवलेली हरभरा डाळ गोरगरीब कार्डधारकांना देण्यात यावी व त्याच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी, एम आय एम पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
5. विमानतळावर 13 मिनिटांत कोरोना चाचणीचा अहवाल
याद्वारे प्रवाशांना अवघ्या 13 मिनिटांत कोरोना चाचणीचा अहवाल मिळणार आहे. यासाठी प्रवाशांना 4500 रुपये मोजावे लागणार आहेत. 15 डिसेंबरपासून या एक्सप्रेस चाचणीला विमानतळावर सुरूवात झाली असून आतापर्यंत 400 एक्सप्रेस चाचण्या केल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे
6. ग्रामपंचायतीच्या निवडणूक अर्जासाठीचा मुदत वाढवून देण्याची मागणी
पुणे जिल्ह्यात अनेकांचे अर्ज न भरले गेल्याने ऑफलाईन अर्ज भरण्याची सोय करण्यात आली आहे. दरम्यान, ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठीदेखील उमेदवारांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून देण्याची इच्छुकांकडून मागणी केली जात आहे.
7. एलआयसीने आपल्या ग्राहकांना केले सावधान
एलआयसीचे काही फ्रॉड अधिकारी असल्याचं भासवत असल्याने अनेकदा ग्राहक देखील त्यांच्या बोलण्याला फसतात पॉलिसीची रक्कम त्वरित देण्यास सांगत आणि अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत त्यामुळे अशा घटनांपासून वाचण्यासाठी एलआयसीने ट्विटवरंरून ग्राहकांना अशा फोन कॉल्स पासून सावधान राहण्याचा इशारा दिला आहे
8. जानेवारीमध्ये 14 दिवस बँका बंद राहणार
नवीन वर्षाचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सगळीकडे उत्साह दिसून येत आहे यातच नववर्षाच्या सुरुवातीला बँका संबंधी काही कामे रखडलेली असेल तर लवकर करून घ्यावी लागणार आहेत कारण जानेवारी महिन्यात तब्बल चौदा दिवस बंद राहणार आहेत
9. मुंबईच्या वेशीवर ‘फास्टॅगसक्ती’ लांबणीवर
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूवर २६ जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र मुंबईच्या वेशीवर दोन महिन्यांनंतर फास्टॅग बंधनकारक होईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने स्पष्ट केले.
10. ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना ७ जानेवारीपर्यंत भारतात ‘नो एन्ट्री
भारतात जवळपास २० करोना पॉझिटिव्ह प्रवाशांच्या शरीरात करोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं तातडीने ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर घातलेली बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
No comments
Post a Comment