Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - फुलपाखरू फेम हृता दुर्गुळेचे वेब सीरीजच्या विश्वात पदार्पण

No comments

 News24सह्याद्री - फुलपाखरू फेम हृता दुर्गुळेचे वेब सीरीजच्या विश्वात पदार्पण...पहा गॉसिप कल्ला


TOP HEADLINES

1. पनवेलच्या फार्महाऊसवर साजरा झाला सलमानचा वाढदिवस
भाईजान, दबंग खान, यारों का यार, सल्लू, चुलबूल पांडे अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता सलमान खान याच्या लोकप्रियतेविषीय नव्यानं काहीच सांगण्याची आवश्यकता नाही. मागील कित्येक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्याच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांच्या वर्तुळात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

2. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार
दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन  यांचा नातू अगस्त्य नंदा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. श्वेता बच्चनला  तिची मुलगी नव्याच्या बॉलीवूड करिअरबद्दल नेहमीच विचारणा करण्यात येते. मात्र, आता बिग बीचा नातू अगस्त्य हाच बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार आहे. रिपोर्ट्सनुसार श्वेता नंदा आणि निखिल नंदाचा मुलगा अगस्त्य लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर नव्याचे फोटो पहात राहतो आणि श्वेताला तिच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल विचारतो  

3. फुलपाखरू’ फेम हृता दुर्गुळेचे वेब सीरीजच्या विश्वात पदार्पण
कोरोना काळात लोक घरबसल्या ओटीटीवर चित्रपट पाहण्याला पसंती देत आहेत. त्यामुळेच सध्या वेब सीरीजकडे प्रेक्षकांचा कल वाढला आहे.  सध्या मराठीमध्येही एक खूप मनोरंजक आणि मुख्य म्हणजे आजच्या काळातील नाते संबंधांवर भाष्य करणारी एक नवीन वेब सीरीज बनत आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळे यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.डुएट’ ही माझी पहिलीच वेब सीरीज असून, या वेब सीरीजबद्दल मी खूप एक्सायटेड आहे, असे हृता दुर्गुळे म्हणाली.

4. ‘ख्रिसमस’चे निमित्त साधत शशांक केतकरने शेअर केली
नाताळच्या निमित्ताने सोशल मीडियावर अनेक पोस्ट पाहायला मिळत आहेत. कुणी ‘ख्रिसमस ट्री’चे फोटो पोस्ट करत आहेत कुणी ख्रिसमस सेलिब्रेशनचे! मात्र, या दरम्यान अभिनेता शशांक केतकरने सगळ्यांनाच एक गुड न्यूज दिली आहे.शशांकची पत्नी प्रियांका गरोदर असून, शशांक लवकरच बाबा होणार आहे. शशांकने पत्नी प्रियांकासोबतचा फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.

5. आमिर खानने कुटुंबासोबत केली जंगल सफारी
आमिर खान आणि किरण रावच्या लग्नाला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमिर खान चक्क गुजरातला गेला आहे. तेही गीरचं अभयारण्य बघायला.  आमिर खान यंदा त्याच्या लग्नाचा वाढदिवस थोड्या हटके पद्धतीने साजरा करत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात, प्राण्यांसोबत त्याचा वाढदिवस साजरा होणार आहे. सलमान गीर सफारीला निघाल्याचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहेत. यावेळी त्याचं कुटुंबही त्याच्यासोबत उपस्थित होतं. या परिसरात 2 -3 दिवस मुक्काम करुन तो घरी परतणार आहे.  


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *