Breaking News

1/breakingnews/recent

सुशांत सिंह प्रकरण बाबत, देशमुख यांचा सीबीआयला सवाल

No comments


मुंबई -

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली होती.  मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात त्याने गळफास घेतला होता. त्याच्या मृत्यूनंतर मात्र उलटसुलट चर्चांचे पेव फुटले होते. अनेकांनी त्यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला होता. त्याचबरोबर हत्या असल्याचंही म्हटले होते. या प्रकरणाची सुरूवातीला मुंबई पोलीस चौकशी करत होते. मात्र, नंतर त्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. मात्र, अद्यापही सुशांतच्या मृत्यूचे गुढ उलगडलेले नाही.

या मुद्यावरून अनेक राजकीय वादविवाद बघायला मिळाले. त्याचबरोबर सुशांतची हत्या झाल्याचा आरोपही करण्यात आला. नंतर या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्यात आली होती. मात्र, सीबीआयकडून यावर कोणतही भाष्य करण्यात आलेले नाही. त्यावरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सवाल उपस्थित केला आहे.

देशमुख  म्हटले आहे की, “सीबीआयने तपास सुरू करून आता जवळपास पाच महिने झाले आहेत. पण अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची हत्या झाली की, त्याने आत्महत्या केली, याचा सीबीआयने अजून उलगडा केलेला नाही. मी सीबीआयला विनंती करतो की, त्यांनी लवकरात लवकर तपासाचे निष्कर्ष जाहीर करावेत,” असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *