Breaking News

1/breakingnews/recent

एकनाथ खडसेंबाबत भाजपचे वागणे खूनशी वृत्तीचे

No comments



मुंबई -

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलत असताना म्हटले आहे की, सिक्वेन्स आणि टाइमिंग पाहिले तर एकनाथ खडसे हे भाजपच्या विरोधी असल्याने भाजप त्यांच्या मागे ED लावत आहेत. जे जे भाजपविरोधी आहेत त्यांच्या मागेच भाजपा ED लावत आहे. भाजप खूनशी प्रवृत्तीने वागत आहे. खुनशी प्रवृत्तीने मागे लागणे हे यापूर्वी भारतात होत नव्हत ते आता होताना दिसत आहे. परंतु खडसे पूर्ण निर्दोष आहेत त्यांच्याकडून कोणतीही चूक झालेली नाही आणि आम्हाला चौकशीचे कोणतेही भय वाटत नाही, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली आहे.

याचदरम्यान जयंत पाटील म्हणाले की  'फडणवीस बरेच वेळा इस्लामपूर मध्ये येऊन गेलेत. फडणवीस आमचे मित्र आहेत. फडणवीस येतात ते त्यांचा पक्ष स्थिरस्थावर करण्यासाठी. शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात भाजप वागत आहे. भाजपकडून शेतकऱ्यांच्या वर अन्याय सुरू आहे. चुकीच्या कायद्याच समर्थन करण्यासाठी फडणवीस तिथे येत असतील तर मी काय बोलायचे. दरम्यान, मराठा आरक्षणा संदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले, मराठा आरक्षण संदर्भात सुरू असणाऱ्या सुनावणीत सरकारनं संपूर्ण लक्ष दिल आहे.सरकारच्या बाजूने सर्व वकील सुप्रीम कोर्टाला मराठा आरक्षनाच महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की मराठा आरक्षण टिकेल. असही पाटील म्हणाले आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *