29 डिसेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री -
35 करोड रुपये खर्चुन उभारण्यात येणार बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल ...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. राहुल गांधींच्या गैरहजेरीमुळे काँग्रेसची कोंडी
भाजपने मात्र राहुल यांच्यावर टीकेची झोड उठवली.राहुल यांच्या आजीची प्रकृती गंभीर असल्याने ते इटलीला गेले असून काही दिवसांत देशात परततील. वैयक्तिक कारणांसाठी विदेशात जाण्याचा व्यक्तीला अधिकार नाही का, असा उलट सवाल राहुल यांचे निष्ठावान आणि संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकारांना केला.
2. कृषीक्षेत्राचा आदर न राखणाऱ्या देशाची अधोगती – कमल हसन
जो देश कृषीक्षेत्राचा आदर करीत नाही तो अधोगतीला जाईल, असेही हसन यांनी म्हटले आहे. शेतकरी हे ‘अन्नदाता’ असल्याचेही हसन यांनी म्हटले आहे.
3. लष्करप्रमुख नरवणे दक्षिण कोरिया दौऱ्यावर
लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे हे सोमवारी तीन दिवसांच्या दक्षिण कोरिया दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. ते दक्षिण कोरियाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन चर्चा करतील त्यात द्विपक्षीय लष्करी सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल.
4. शेतकऱ्यांशी उद्या चर्चा
नव्या कृषी कायद्यांसह अन्य मुद्यांवर चर्चा करण्याच्या शेतकरी संघटनांच्या प्रस्तावाला प्रतिसाद देत, केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांना उद्या दुपारी २ वाजता बैठकीला बोलावले आहे. मात्र, पंतप्रधानांवर दबावतंत्राचा परिणाम होणार नाही, असे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.
5. संत्र्याच्या उत्पादनात महाराष्ट्र मागेच
देशातील १५ राज्यांमध्ये संत्री उत्पादन घेतले जाते. त्यातही कर्नाटक, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र हे प्रमुख उत्पादक प्रदेश आहेत. देशात सर्वाधिक संत्रा बागा या महाराष्ट्रात असल्या, तरी उत्पादन आणि उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र तळाशी आले आहे.
6. समुद्रात मच्छीमार बोटीवर हल्ला
सईतील मासेमारी करण्यासाठी गेलेल्या स्थानिक मच्छीमारांच्या बोटीवर खोल समुद्रात अज्ञात बोटीतील व्यक्तींनी हल्ला केला. यात दोन मच्छीमार जखमी झाले आहेत. या संदर्भात वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 7. 35 करोड रुपये खर्चुन उभारण्यात येणार बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल
उल्हासनगर शहरात हिंदू ह्रुदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भव्य असे क्रींंडा संकुल व स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे वरिष्ट नगरसेवक धनंजय बोडारे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.8. चिमुकलीचे अपहरण संशयातून भंगार वेचणाऱ्यास बदडले
काही कामगारांनी चोप देणाऱ्या नागरीकांच्या तावडीतून संशयीताची सुटका केली व त्यास वाळूज एमआयडीसी पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले.
9. ५ किलो प्लास्टिक द्या आणि पोळीभाजी मोफत घ्या
केडीएमसी, तृप्ती गृह उदयोग आणि सिध्दी वेस्ट टू ग्रीन लिमिटेड या एनजीओच्या माध्यमातून केडीएमसीने 05 किलो प्लास्टिक दया आणि पोळीभाजी मोफत घ्या अशी अभिनव संकल्पना सुरू केलीय .डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर भागात ही संकल्पना राबवली जात असून या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे
10. गॅस सिलिंडरची दरवाढ त्वरित रद्द करा
अनुदानित सिलेंडरची संख्या देखील कमी आहे दर महिन्याला सरकार ही दरवाढ करू लागलेली आहे त्यामुळे दरवाढ त्वरित रद्द करून द्या सिलेंडरची किंमत पूर्ववत करावी अशी मागणी घेऊन राष्ट्रवादी महिला काँग्रेस वसमत च्या वतीने आज उपविभागीय कार्यालयासमोर भाजी भाकरी चुलीवर तयार करून राज्य शासनाचा निषेध करत राष्ट्रवादी शहर अध्यक्षा यांच्यावतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले
No comments
Post a Comment