शहराची खबरबात - मनपातील भाजप-राष्ट्रवादीच्या युतीवर जोरदार टीका
News24सह्याद्री - मनपातील भाजप-राष्ट्रवादीच्या युतीवर जोरदार टीका....पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना विकास आराखडा तयार करण्यासाठी तब्बल 21 कोटी 50 लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला महापालिकेला स्वतःच्या तिजोरीतून हा निधी द्यावा लागणार आहे विकासकामांना निधी नसताना केवळ आराखडा वरच कोट्यावधीची उधळपट्टी सुरू असल्याचे दिसते
2. नाफेडतर्फे नगर बाजार समिती त तूर खरेदी केंद्र सुरू
शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी अंतर्गत नाफेड च्या वतीने नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर खरेदी केंद्र सुरू केली असल्याची माहिती सभापती अभिलाष घिगे यांनी दिली बाजार समितीत हे केंद्र आज पासून सुरू होणार आहे शासनाने कडधान्य खरेदीचे दर जाहीर केले असून त्यानुसार तूर शेतमालास प्रतिक्विंटल सहा हजार रुपये प्रमाणे बाजार भाव जाहीर केलेला आहे

3. पटवर्धन चौक परिसरात खड्डेच खड्डे
शहरातील पटवर्धन चौकात येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत नालेगाव कापड बाजार चितळे रोड जुन्या कोर्टाकडे जाण्यासाठी येथून ये-जा करावी लागते या सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते पाऊस थांबून दोन महिने होऊनही अद्याप महापालिका प्रशासनाने येथील खड्डे बुजवलेले नाहीत त्यामुळे परिसरात छोटे-मोठे अपघात होत आहेत त्यामुळे येथील खड्डे बुजवावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे

4. मनपातील भाजप-राष्ट्रवादीच्या युतीवर जोरदार टीका
या युतीमुळेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही नगर शहराचा विकास खुंटला आहे, अशा शब्दात काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपातील भाजप-राष्ट्रवादीच्या युतीवर जोरदार टीका केली.काँग्रेस पक्षाच्या १३६ व्या स्थापना दिनानिमित्त सेल्फी विथ तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली. या वेली काँग्रेस पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात काळे बोलत होते 5. कालच्या लिलावात कांद्याला मिळाला २६०० भाव
नगर बाजार समितीत सोमवारी झालेल्या कांदा लिलावात २६०० रुपये भाव मिळाला तर एकूण 44 हजार 240 क्विंटल कांदा गोण्यांची आवक झाली मागील लिलावात कांद्याला तीन हजारांपर्यंत भाव मिळाला होता तर नगर बाजार समितीत 80 हजार 437 कांदा गोण्यांची आवक झाली होती

No comments
Post a Comment