Breaking News

1/breakingnews/recent

27 डिसेंबर सह्याद्री बुलेटिन

No comments

News24सह्याद्री - WHO च्या प्रमुखांचा इशारा....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES


१. वनप्राण्याचा बकरीवर हल्ला

गंगापूर तालुक्यात प्रींप्री शिवारात एका वन्यप्राण्याने सात बकऱ्यांचा फडशा पाडून एक बकरी ऊसाच्या शेतात ओढत घेऊन जात त्या बकरी ही फस्त केल्याने पिंप्री परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरलेआहे. ग्रामस्थांनी हा वन्यप्राणी बिबट्या असल्याचा दावा करत त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. तर वनाधिकाऱ्यांनी तो प्राणी तडस असावा,असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

२. बुलेट ट्रेन फक्त गुजरातमध्येच धावणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ठाणे महापालिकेनं बुलेट ट्रेनच्या थांब्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव गुंडाळून लावला. त्यामुळे केंद्र राज्यातील संघर्षातून बुलेट ट्रेनचं काम लांबण्याची चिन्हं आहेत. त्यातच रेल्वे मंडळाचे अध्यक्षांनी जागा मिळण्यास विलंब झाल्यास फक्त गुजरातमध्ये बुलेट ट्रेन चालवण्याचे संकेत दिले आहेत.  

३. भारत भालकेंच्या जागेवर पार्थ पवार?

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण व्हायला हवं. पार्थ पवार पंढरपूरमध्ये आले तर रखडलेला विकास लवकर होईल, त्यामुळे पार्थ यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी अमरजित पाटील यांनी केलीय.  

४. WHO च्या प्रमुखांचा इशारा

संपूर्ण जगाला 2020 या वर्षात कोरोना व्हायरसचा फटका बसला. एकही देश या संसर्गजन्य आजाराच्या तडाख्यातून सुटला नाही. वर्षातील बहुतेक काळ लॉकडाऊनमध्ये घालवल्यानंतरही जगाची यामधून सुटका झालेली नाही. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानंतर सर्वांची धास्ती आणखी वाढली आहे.संपूर्ण जगाला वेठीस धरणारी कोरोना व्हायरस ही जगातील अंतिम महामारी नाही', असा इशारा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रेसियस यांनी दिला आहे.

५. एसटीचा प्रवास  होणार अधिक वेगवान

एसटीचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. कारण कुठल्याही हॉटेलच्या थांब्यावर बस 15 मिनिटांहून अधिक वेळ थांबल्यास संबंधित बस चालक-वाहकाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. काही चालक-वाहक प्रवाशांना जेवणासह इतर सुविधांचा लाभ घेता यावा म्हणून जास्त वेळ बस थांबवून ठेवतात. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक विभाग नियंत्रकाला चालक-वाहकांना स्पष्ट सूचना देण्यास सांगण्यात आलं आहे.

६. SBI ने केले  ग्राहकांसाठी नवीन YONO  अॅप लॉन्च 

आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत रिटर्न न भरणा्यांना दंड भरावा लागू शकतो. म्हणूनच, देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी विशेष सेवा सुरू केली आहे. एसबीआयने  प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार तुम्ही  YONO अॅपद्वारे कोणत्याही अडचणीशिवाय टॅक्‍स भरू शकता.  

७. अ‍ॅमेझॉननंतर मनसेचा पश्चिम रेल्वेला इशारा

मराठीच्या मुद्यावर अ‍ॅमेझॉनला दणका दिल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपला मोर्चा पश्चिम रेल्वेकडे वळवला आहे. पश्चिम रेल्वेने माहिती पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा, अशी मागणी मनसेनं केली आहे.  

८. बालाजी जाधव यांनाही आंतरराष्ट्रीय पुरस्कार !

कोरोनाच्या काळात सर्वात जास्त प्रभावित झाले ते शिक्षण क्षेत्र त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे   मात्र या ऑनलाईन शिक्षणा पासून वंचित राहावे लागणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बालाजी जाधव यांनी  नवनवीन प्रयोग केले असाच एक प्रयोग यशस्वी केला. तो टाळेबंदीच्या काळात मुलांना शिक्षण देण्यासाठी अभिनव मार्ग शोधणारे बालाजी जाधव हे आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत  .

९. आटपाडीतील  16 लाखाच्या बकऱ्याची चोरी

आटपाडीतील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारात दीड कोटी रुपये दर असलेला मोदी बकरा आणि त्याचाच वंश असलेल्या 16 लाखाचा बकरा चर्चेचा विषय ठरला होता. याच सोळा लाख रुपये किंमत असलेल्या बकऱ्याची शनिवारी पहाटे चोरी झाली असून आलिशान चारचाकी गाडीतून हा बकरा लंपास करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.  

१०. बॉक्सिंग डे कसोटीत पहिला भारतीय फलंदाज

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय फलंदाजी डगमगून जाईल, असा अंदाज होता. पण, अजिंक्य रहाणेनं मुंबईकरांचा 'खडूस'पणा दाखवला आणि सर्वांचे अंदाज चुकवले. बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी कल्पक नेतृत्वानं वाहवाह मिळवणाऱ्या अजिंक्यनं दुसऱ्या दिवशी फलंदाजीने सर्वांना मंत्रमुग्ध केलं. अजिंक्यनं केवळ वैयक्तिक शतकी खेळीच केली नाही, तर हनुमा विहारी, रिषभ पंत यांच्यासह अर्धशतकी आणि रवींद्र जडेजासह शतकी भागीदारी करून संघाच्या धावसंख्येत भर घातली.अजिंक्य रहाणेनं टीम संकटात असताना शतकी खेळी केली. कसोटीतील त्याचे हे १२ वे शतक ठरले. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे हे दुसरे शतक आहे. त्याच्या या शतकानं मोठा इतिहास घडवला. बॉक्सिग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला.  


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *