Breaking News

1/breakingnews/recent

रोहित पवारांचे भाजप नेत्यांना ओपन चॅलेंज , म्हणाले ....

No comments

मुंबई -

दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या महिनाभरापासून आंदोलन करत आहे. तसेच त्यांचे हे आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी सरकारच्या या बैठकीत केवळ कृषी कायदा मागे घेणे आणि एमएसपी यावरच चर्चा होईल असे स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभूमीवर  राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना ओपन चॅलेंज देत म्हटले आहे की , खरंच हिंमत असेल तर राज्याच्या वाट्याचे हक्काचे #GST चे पैसे आणण्यासाठी केंद्राकडे  प्रयत्न करावेत आणि कांदा निर्यातबंदी उठवून दाखवावी आणि मगच कृषी कायद्यांच्या समर्थनाच्या बाता माराव्यात, असे चॅलेंज पवार यांनी दिले आहे.

तसेच, शेतकरी आंदोलनाला तब्बल एक महिना झाला तरी शेतकरी आंदोलनाच्या मुख्य मागण्या अद्यापही केंद्र सरकारच्या लक्षात येत नाहीत ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे हमीभाव! मग हमीभावाबद्दल बोलणं अपेक्षित असताना शेतकरी मालक होईल, शेतकऱ्याला माल विकण्याचे स्वातंत्र्य मिळेल अशा इतर गोष्टी सांगण्यातच सरकार वेळकाढूपणा करत आहे. पण हमीभावाबद्दल चकार शब्दही काढत नाही. विरोधी पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा कांगावा सरकारकडून केला जातो पण तिन्ही कायद्यांमध्ये हमीभावाच्या संरक्षणाची एक ओळ का टाकत नाही? सरकारला शेतकऱ्यांची एवढी काळजी आहे तर या कायद्यांमध्ये हमीभावाचा उल्लेख करुन विरोधी पक्षाच्या मुद्द्यांमधली हवाच काढून घ्या ना! यासाठी विरोधी पक्षाने काही सरकारला रोखलेले नाही. एकीकडे केंद्रातील काही मंत्री म्हणतात की सरकारने पाच वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले तर दुसरीकडे नवे कृषी कायदे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हाव म्हणून आणले जात असल्याचंही काही केंद्रीय मंत्री म्हणतात. म्हणजेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाल की करायचंय याबाबतच केंद्रीय मंत्र्यांमध्येच एकमत नाही.

पुढे पवार म्हटले की, महाराष्ट्र भाजपा तर रेटून खोट बोलण्यात इतकी पुढ गेलीय की आपण काय बोलून जातो याचंही त्यांना भान राहत नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच अस्तित्व संपणार नाही, असं केंद्र सरकार म्हणते आणि दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची लूट होत असल्याची ओरड महाराष्ट्र भाजपचे नेते करतात. एकंदरीतच सगळाच सावळा गोंधळ सुरु आहे. असे ही  पवार म्हटले आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *