Breaking News

1/breakingnews/recent

भारत भालके यांच्या जागी पार्थ पवारांची लागणार वर्णी ?

No comments


मुंबई - 

मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे नुकतेच निधन झाले आहे. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर भालके यांच्या जागी राष्ट्रवादीकडून कुणाला संधी मिळणार याविषयी राजकीय वर्तुळात आता रंगताना दिसत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना पोटनिवडणुकीत संधी देण्यात यावी अशी मागणी देखील आता जोर धरत आहे. माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी पार्थला संधी देण्याची मागणी केली आहे.

अमरजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना याविषयीचे पत्र लिहीत म्हटले आहे की, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भावनेचे नाही तर विकासाचे राजकारण व्हायला हवे. पार्थ पवार पंढरपूरमध्ये आले तर रखडलेला विकास लवकर होईल, त्यामुळे पार्थ यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी अमरजित पाटील यांनी केली आहे. 

दरम्यान, पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याबाबत तरुणाईचा विरोध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकाराव्या लागलेल्या पार्थ पवार यांचे पुनर्वसन केले जाणार की, भारत भालके यांच्या मुलाला उमेदवारी मिळणार हे पाहने महत्वाचे ठरणार आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *