सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - अवेळी पाऊस... नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पाल्यांचे परीक्षा शुल्क!
News24सह्याद्री -
क्यार आणि महा या दोन चक्री वादळामुळे आलेल्या अवेळी पावसाने नुकसान झालेल्या राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ३४९ तालुक्यांमधील शेतकर्यांचे पाल्य असणार्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थी तसेच पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गावांना होणार आहे. याशिवाय नाशिकमधील १५, जळगावमधील १५, पुणेमधील १३, ठाणेमधील ६, पालघरमधील ८, रायगडमधील १५, सातारामधील ११, सांगलीमधील १०, सोलापूरमधील ११, औरंगाबादमधील ९, जालनामधील ८ अशा व इतर जिल्ह्यांमधील तालुक्यांचा समावेश आहे. राज्याचे अव्वर सचिव संजय धारुरकर यांच्या सहीने हे आदेश आज काढण्यात आले.
No comments
Post a Comment