Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - शिर्डीकरांना मंदिरातील अर्धनग्न पुजारी चालत असतील तर तोकड्या कपड्यांवर आक्षेप का ? - तृप्ती देसाई

No comments

 News24सह्याद्री -




शिर्डीतील साईबाबा मंदिर येथे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानाने भाविकांना केली आहे. यावरून मोठा वाद पेटला आहे. तृप्ती देसाई यांनी हा बोर्ड संस्थानने काढला नाही तर आम्ही येऊ काढू, असा इशाराच दिला आहे. काय म्हणाल्यात तृप्ती देसाई.शिर्डी संस्थानने श्री साईबाबा समाधी मंदिराच्या आवारात पेहरावासंदर्भात लावलेला बोर्ड तातडीने काढावा. अन्यथा शिर्डीत येऊन आम्ही तो बोर्ड काढू,’ असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिलाय. ’मंदिरांमधील पुजारी हे अर्धनग्न अवस्थेत असतात. ते फक्त सोवळे नेसतात, त्यावर कधी कोणत्या भक्ताने आक्षेप घेतला नाही वा अर्धनग्न पुजार्‍यांना मंदिरात प्रवेश नाही, असा बोर्डही लावला नाही’, असे नमूद करत संस्थानच्या निर्णयावर तीव्र आक्षेपही देसाई यांनी नोंदवला. आता या संदर्भात देवस्थान समिती आणि शिर्डीकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *