“संजय राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे निव्वळ कांगावा”- केशव उपाध्ये
मुंबई -
शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. संजय राऊत यांनी घेतलेली पत्रकार परिषद हा निव्वळ कांगावा असल्याच आता भाजपाचे भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे. ईडी ने पाठवलेल्या नोटिशीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे निव्वळ कांगावा होता. ईडीने चुकीच्या पद्धतीने नोटीस पाठवली असं वाटत असेल तर संजय राऊत यांनी ईडी विरोधात खुशाल न्यायालयात जावे असेही केशव उपाध्येंनी म्हटले आहे. उपाध्ये यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की संजय राऊत यांची पत्रकार परिषद ही फक्त आणि फक्त कांगावा करण्यासाठी होती.
राजकीय षड्यंत्र वगैरे गोष्टी बोलण्यापेक्षा राऊत यांनी त्यांच्या कुटुंबीयांना आलेल्या नोटिशीबाबत ईडी कडे समाधानकारक उत्तर सादर करावे. ईडीने चुकीच्या पद्धतीने नोटीस पाठवली असेल तर राऊत यांना ईडी विरुद्ध न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे. सोमवारी सकाळपर्यंत नोटीस मिळालीच नाही असे म्हणणाऱ्या राऊत यांनी लगेच पत्रकार परिषद घेतली.पत्रकार परिषद घेण्याऐवजी त्यांनी नोटीस का बजावली गेली? यामागच्या कारणांचा शोध घ्यावा व ईडी पुढे आपले म्हणणे सादर करावे.तसे करण्याऐवजी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन कांगावा करण्याचा मार्ग स्वीकारला, असेही केशव उपाध्ये यांनी नमूद केले.

No comments
Post a Comment