Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - अधिकारी दीपक चंगेडिया यांची नार्को टेस्ट करावी - गांधी समर्थक

No comments

   News24सह्याद्री अधिकारी दीपक चंगेडिया यांची नार्को टेस्ट करावी -  गांधी समर्थक....पहा शहराची खबरबात




TOP HEADLINES


1. खरात यांच्यावरील कारवाईचा चेंडू स्थायी समितीने टोलवला महासभेकडे   
 विषय आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत  मांडण्यात आला होता ,मात्र यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नसून उलट हा विषय महासभेकडे सोपवावा असे सांगत खरात यांच्यावरील कारवाईचा चेंडू आता महासभेकडे टोलवला आहे, 

2. हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा 
 नगर-कल्याण रस्त्यावर हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी या हुक्का पार्लरवर छापा टाकत मोठी कारवाई केली,  याप्रकरणी 20 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले  असून आरोपींकडून चार हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ,

3. अधिकारी दीपक चंगेडिया यांची नार्को टेस्ट करावी -  गांधी समर्थक 
चंगेडिया यांनी विरोधी मंडळातील सभासदांबरोबर संगणमत करून व तपास न करताच जाणीवपूर्वक अपहाराचा खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणारा अहवाल तयार केला आहे असल्याचा आरोपही या समर्थकांकडून करण्यात येत आहे . यासंदर्भात पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनही देण्यात आले असून आता यावर पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे . 

4. विद्यार्थ्यांच्या फी प्रश्नासंदर्भात मनसे आक्रमक 
यांसंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देत विद्यार्थ्यांच्या भविष्याचा व सध्याच्या परिस्थितीचा विचार करता हा फी चा प्रश्न गांभीर्याने घ्यावा अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे . 

5. गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक
यावेळी शहरातील  सिध्दीबागेसमोरील रस्त्यावर चुल मांडून महिला कार्यकर्त्यांनी  भाकरी भाजण्याचे आंदोलन करत या दरवाढीचा निषेध नोंदवला . केंद्रसरकारने हि  गॅस सिलेंडरची दरवाढ त्वरित रद्द करून किंमत पूर्ववत करावी, अशी मागणी उपस्थितांनी लावून धरली . 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *