Breaking News

1/breakingnews/recent

राज ठाकरे विरुद्ध अ‍ॅमेझॉन वाद चिघळणार

No comments




मुंबई -

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचे पाणी पाजणार अशी प्रतिक्रिया मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला आहे. राज ठाकरे यांना दिंडोशी न्यायालयाने नोटीस पाठवली असून यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये अ‍ॅमेझॉनसोबतचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मनसेने आपण भूमिकेवर ठाम राहणार असल्याचं सांगताना यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा अ‍ॅमेझॉनला दिला आहे. 

मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात अ‍ॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली आहे. यानंतर दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कोर्टाने राज ठाकरे आणि काही मनसे सचिवांना ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.  राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानंतर मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया दिली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *