दारुवाल्यांची सेवा हाच महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम - चित्रा वाघ
मुंबई -
चित्र वाघ यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला त्या म्हणाल्या की मंदिराच्या आधी बार उघडले आणि आता दारु परवान्यांवर थेट ५० टक्के सूट देण्यात आलीय. हे सरकार दारुवाल्यांवर इतके मेहरबान का आहे? की दारुवाले सरकारमधील काही मंत्र्यांवर मेहरबान आहेत का?, याचा शोध घेण्याची गरज वाटते अशा शब्दांमध्ये चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला आहेराज्यामधील महाविकास आघाडी सरकारने रेस्तराँ आणि बारचालकांना मोठा दिलासा देत परवाना शुल्कात राज्य सरकारने ५० टक्क्यांची कपात केली आहे. मात्र आता यावरुन भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मंदिराच्या आधी बार उघडले आणि आता दारु परवान्यांवर थेट ५० टक्के सूट देण्यात आलीय.
हे सरकार दारुवाल्यांवर इतकं मेहरबान का आहे? की दारुवाले सरकारमधील काही मंत्र्यांवर मेहरबान आहेत का?, याचा शोध घेण्याची गरज वाटते अशा शब्दांमध्ये चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. इतकच नाही तर त्यांनी सर्वसामान्य जनता वीजबिलात सूट द्या म्हणत रस्त्यावर उतरली घरपट्टी पाणीपट्टी कशातच सूट देण्यात आली नाही मात्र दारुवाल्यांना लगेच सूट देण्यात आली नाही असं म्हणत वाघ यांनी हे सरकार गोरगरीबाचे आहे की दारुवाल्याच आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे. करोनामुळे हॉटेल व्यावसायिक छोटे-मोठे व्यापारी सर्वच त्रस्त झालेले आहेत.
सरकारकडे वारंवार मागण्या करुनही त्यांना काही मिळत नाहीय. मग हे सरकार दारुवाल्यांवर मेहरबान का? की दारुवाले सरकारमधील काही मंत्र्यांवर मेहरबान आहेत?, याचा शोध घेण्याची गरज वाटते. सर्वसामान्य नागरिक हा रस्त्यावर उतरला. वीजबिलामध्ये सवलत द्या अशी मागणी केली. सरकारने सवलत दिली नाही. घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल कशामध्येच सर्वसामान्यांना दिलासा मिळाला नाही. हे सरकार गोरगरिबांच आहे की दारुवाल्यांच?, दारुवाल्यांची सेवा हाच महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम आहे का? अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

No comments
Post a Comment