Breaking News

1/breakingnews/recent

राजू शेट्टी महाविकास आघाडीच्या बाजुने तुणतुणे घेऊन उभे - आशिष शेलार

No comments



 मुंबई -

भाजप नेते आशिष शेलार यांची टीका स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे. सत्तरच्या दशकात आलेल्या पिंजरा या चित्रपटातील आदर्श शिक्षकाला एका मोहापायी तमाशाच्या फडात तुणतुण घेऊन उभे रहाव लागत. तशी अवस्था राजू शेट्टींची झाली असल्याच शेलार यांनी म्हटले आहे.विधान परिषदेच्या आमिषापोटी शेतकऱ्यांचा नेतृत्व करणारे राजू शेट्टी आडतदार, दलालांसाठी महाविकास आघाडीच्या बाजुने तुणतुणे घेऊन उभे राहून त्यांची वकिली ते करत असल्याचं शेलार म्हणाले. त्यामुळे शेलारांनी केलेल्या या टीकेवर राजू शेट्टी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात सुरू होणाऱ्या 'किसान आत्मनिर्भर यात्रे'च्या पार्श्वभूमीवर 'कोणीही आमच्या बालेकिल्ल्यात आले तरी काही फरक पडणार नाही, असा टोला शेट्टी यांनी लगावला होता.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *