शिरपूरात रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला जोडा मारो आंदोलन
मुंबई
दानवे यांच्या वक्तव्यवर शेतकरी आंदोलना मागे पाकिस्तानचा हात असल्याच ते म्हणाले या वक्तव्यवर शिरपूरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलना मागे चीन व पाकिस्तानचा हात असल्याचे कथित वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला शिरपूर शहरातील काँग्रेस , शिवसेना , प्रहार जनशक्ती पक्ष , भारतीय कम्युनिस्ट पक्ष व शेतकरी फाऊंडेशनच्या पदधिकाऱ्यांनी काल जोडे मारून संताप व्यक्त केला. विजयस्तंभ चौकात एकत्र झालेल्या पदधिकाऱ्यांनी दानवेंच्या प्रतिमेला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर प्रांतधिकारी विक्रांत बांदल यांना निवेदन दिले. त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष मनोहर पाटील व कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे

No comments
Post a Comment