काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट: संजय निरुपम
मुंबई
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट सुरु असल्याचा आरोप केला आहे. राज्यात आणि देश पातळीवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं नाव चर्चेत आहे. यामागाचं कारण म्हणजे गुरुवारी दिल्लीत शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करण्याची चर्चा रंगली होती. लवकरच शरद पवार युपीएच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्विकारतील असा दावा केला जात आहे. मात्र यादरम्यान राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने धक्कादायक आरोप केला आहे.
इतकंच नाही तर शरद पवार यांना युपीए अध्यक्ष करण्याची चर्चा हा राहुल गांधींविरोधातील मोहिमेचा भाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधींविरोधात एक मोहिम सुरु असून शरद पवार यांना युपीए अध्यक्ष करण्याची चर्चा हा त्याचाच एक भाग आहे. याच मोहिमेअंतर्गत २३ स्वाक्षऱ्या असणारी चिठ्टी लिहिण्यात आली होती. यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात सुसंगततेची कमतरता शोधण्यात आली. काँग्रेसला संपवण्याचा एक मोठा कट आहे.

No comments
Post a Comment