शिवसेनेन अमिताभचा आणलेला आव कायम ठेवावा - भाजपा
मुंबई -
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली.मोदी सरकार आणि राज्यातील भाजपा नेत्यांविरोधात संजय राऊत आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीकेचा सूर लावला. आघाडीतील नेत्यांना आणि कुटुंबीयांना नोटीस म्हणजे राजकीय सूडबुद्धी असा आरोप शिवसेनेने केला. अभिनेत्री कंगना राणौत आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई झाली, तेव्हा राऊत यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या शैलीत या कारवाया कायद्याप्रमाणे सुरू असल्याचे सांगितले होते. त्याच मुद्द्यावरून भाजपाचे अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला खोचक सल्ला दिला.
कंगना आणि अर्णबवर कारवाई करताना शिवसेनेन अमिताभचा आणलेला आव कायम ठेवावा, “अभिनेत्री कंगना राणौत, पत्रकार अर्णब गोस्वामी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांवर चुकीचे खटले दाखल केले जातात तेव्हा तुम्ही त्याला कायद्याच नाव देता. आणि तुमच्यावर कारवाई झाली तर मात्र ती राजकीय सूडबुद्धी असे तुमच्याकडून म्हटले जाते. मी सांगेन ते धोरण आणि मी बांधेन ते तोरण हे उद्योग आता बंद करा. न्यायालयाच्या थपडा तुम्ही खाल्ल्या आहे. घटनेच राज्य तर दूर राहिल पण महाराष्ट्रात साध कायद्याचे राज्यही सध्या अस्तित्वात नाही. अहंकार आणि विद्वेष यांचे राज्य आहे. अशा गोष्टींबाबत न्यायालयात तुम्हाला थपडा मिळत आहेतच पण जनताही तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी जोरदार टीका त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केली.

No comments
Post a Comment