Breaking News

1/breakingnews/recent

‘ईडी’कडून केवळ एक नोटीस आली आणि पक्ष हादरला, पक्ष घाबरला'- राम कदम

No comments



मुंबई -

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’ने नोटीस पाठवल्यापासून मोदी सरकार आणि भाजपा विरोधात शिवसेनेने टीकेचा सूर लावला आहे. मागील दोन दिवसांपासून संजय राऊत भाजपाला लक्ष्य करताना दिसत असताना ‘सामना’च्या अग्रलेखातूनही शिवसेनेने भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. भाजपा नेत्यांनी शिवसेना व संजय राऊतांवर जोरदार टीका केली. भाजपाचे आशिष शेलार, केशव उपाध्ये, किरीट सोमय्या, अतुल भातखळकर यांच्यानंतर राम कदम यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत ‘सामना’मध्ये लिहित होते तोपर्यंत ते एक वर्तमानपत्र होते. आता मात्र ते केवळ एका पक्षाची जाहिरात करण्यासाठी सुरू असलेले हॅण्डबिल आहे. सामनामध्ये हल्ली राम मंदिराबरोबरच बाबरी मशीदचाही उल्लेख होतो. राम मंदिराचा निर्णय लवकर लागू नये म्हणून ज्या काँग्रेस पक्षाने वकिलांची फौज उभारली, त्याच हिंदुत्वविरोधी काँग्रेससोबत शिवसेना सत्तेत आहे. ही दुटप्पी भूमिका कशी चालेल? ‘ईडी’कडून केवळ एक नोटीस आली आणि पक्ष हादरला, पक्ष घाबरला”, अशा शब्दात राम कदम यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांचा समाचार घेतला.



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *