Breaking News

1/breakingnews/recent

कोल्हापूरला परत जाणार म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवारांचा टोला

No comments




मुंबई -

पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले.भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपण पुन्हा कोल्हापूरला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला आहे. पुणे विधान भवन येथे अजित पवारांच्या हस्ते चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. 

सरकार नाही त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणत होते. आता दुसरे म्हणतात मी परत जाईन. परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलवालंही नव्हते. आमच्या भगिनी मेधा कुलकर्णी, कार्यकर्ते उगाच नाराज झाले. निवडणुकीत कोणी कुठे उभे राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक वर्ष होण्याआधीच परत जाण्याची भाषा करु लागले. लोकांनी पाच वर्षासाठी निवडून दिले आहे. कोथरुडची कामे व्हावीत अपेक्षा आहे. उद्या लोकं कामे घेऊन गेले तर मी परत जाणार आहे सांगतील. मग आले कशाला? कोल्हापुरलाच थांबायचं होते असा टोला त्यांनी लगावला.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *