Breaking News

1/breakingnews/recent

'रतन खत्रीचे आकडे सांगून काय उपयोग?' शेलारांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न

No comments



मुंबई -

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्नही विचारले मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०’ या उपक्रमांतर्गत वर्षभरात विविध कंपन्यांशी सामंजस्य करारांद्वारे दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य सरकारने आणल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग विभागाच्या वतीने २५ भारतीय कंपन्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ६१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. यातून अडीच लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

 २ लाख ५० हजार नवे रोजगार आणि ६१ हजार कोटींची गुंतवणूक? हे रतन खत्रीचे आकडे सांगून काय उपयोग? आधी हे सांगा आत्महत्या करणाऱ्या शिक्षकांना पगार कधी देणार? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कधी करणार? वीज बिलांचा झटका दिलात त्यांना दिलासा कधी देणार? बारा बलुतेदारांच्या मदतीचे काय झाले? निसर्ग चक्रीवादळ ग्रस्तांना मदत कधी मिळणार? उध्दवस्त पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी पोहचणार? आरोग्य सेविका, कोविड योद्धे यांना मानधन कधी मिळणार? शाळांची फी कपात करुन पालकांना दिलासा कोण देणार?  अशाप्रकारे आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच, सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे? कशी आणणार गुंतवणूक ज्यांचे विकासाशी सदैव वाकडे! असा टोलाही आशिष शेलारांनी लगावला.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *