Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - ओळखपरेड झाली; दोन्ही मारेकर्‍यांना तीनही साक्षीदारांनी ओळखले

No comments

    News24सह्याद्री -




रेखा जरे हत्याकांडाशी निगडीत या क्षणाची महत्वाची बातमी आहे. रेखा जरे हत्याकांडात पोलिस निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपले आहेत. जरे यांची हत्या केलेल्या दोन्ही आरोपींबाबत महत्वाची माहिती समोर आलीय. पारनेरच्या दिवाणी न्यायालयाने जरे यांची हत्या करणार्‍या दोन्ही आरोपींची ओळखपरेड घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ज्ञानेश्‍वर उर्फ गुड्डू शिंदे आणि फिरोज शेख या दोन्ही आरोपींची न्यायदंडाधिकार्‍यांसमोर ओळख परेड घेण्यात आली. जरे यांचे हत्याकांड झाले त्यावेळी त्यांच्या समवेत असणारी त्यांची आई, मुलगा आणि त्यांची मैत्रीण माने या तीघांनाही न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर व्हावे लागले. या तीघांनीही या दोन्ही आरोपींना ओळखले. कुणाल जरे याने हेच ते आरोपी असे म्हणत आरोपींची ओळख दिली. आरोपींच्या ओळखपरेड मध्ये तीनही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपी ओळखल्याने या घटनेचा मास्टरमाईंड बाळ बोठे याच्यासमोरच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे मानले जाते. रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सुत्रधार बाळ बोठे याच्या अटकपुर्व जामिन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *