Breaking News

1/breakingnews/recent

डॉ. सुजय विखेंना मंत्रिपदाचे वेध?

No comments



मुंबई -

डॉ. सुजय विखे पाटील यांना खासदारकीनंतर आता केंद्रात मंत्रिपदाचे वेध लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना आता केंद्रीय मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच अमित शहा यांची घेतलेली भेट आणि शिर्डीमध्ये केलेल्या सूचक वक्तव्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे.अलीकडेच त्यांनी घेतलेली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट आणि त्यानंतर शिर्डीत केलेले सूचक वक्तव्य यामुळे जिल्ह्यात याबाबत चर्चा सुरू झाली विखे यांच्या कुटुंबातील स्व. बाळासाहेब विखे पाटील हे दीर्घकाळ खासदार होते. काही काळ केंद्रीय राज्यमंत्रीही होते. त्यांचे चिरंजीव आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील राज्याच्या राजकारणात, तर त्यांचे वडील देशाच्या राजकारणात असेच जणू वाटत होते. बाळासाहेब विखे पाटलांच्या निधनानंतर त्यांचे नातू डॉ. सुजय भाजपकडून खासदार झाले आहेत.

 त्यामुळे ते आता देशाच्या राजकारणात सक्रीय राहणार, असे मानले जाते. खासदारकीची पहिलीच टर्म असतानाही त्यांना आता मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. केंद्रातील भाजपच्या सरकारचे धोरण, तरुणांना अनुकूल आणि विरोधकांना शह देण्यासाठीची रणनिती याचा फायदा घेत मंत्रिपद मिळण्याची अटकळ विखे यांना असल्याचे मानले जाते.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा सध्या सुरू आहेत. अशातच गेल्या आठवड्यात खासदार डॉ. विखे आणि त्यांचे वडील राधाकृष्ण यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री शहा यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियात शेअर केले. मात्र, आता शिर्डीतील एका कार्यक्रमात डॉ. विखे यांनी यासंबंधी एक सूचक वक्तव्य केले आहे. ‘साईबाबांच्या कृपेने केंद्रात मंत्री झालो, तरी मी आहे असाच कार्यकर्त्यांसोबत राहीन’, असे वक्तव्य त्यांनी केले.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *