भाजपचे हिंदुत्व म्हणजे 'नाटकबाजी'- संजय राठोड
मुंबई -
शिवसेनेच्या हिंदुत्वाला बाळासाहेबांचा वारसा आहे. याउलट भाजपचं हिंदुत्व म्हणजे केवळ नाटकबाजी असल्याची अप्रत्यक्ष टीका राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी केली. शिवसेनेचे हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. मात्र, काहीजण हिंदुत्वाच्या नावावर नाटकबाजी करत असल्याचे सांगत राठोड यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
ते मंगळवारी अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कृषी कायदे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला लक्ष्य केले. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यावर अनेक संकटं आली आहेत. मात्र, केंद्र सरकारने राज्याला फुटक्या कवडीची मदत केली नाही. राज्याच्या हक्काची जीएसटीच्या परताव्याची रक्कमही केंद्र सरकारने दिलेली नाही. केंद्र सरकार महाराष्ट्राकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही राठोड यांनी केला.

No comments
Post a Comment