शहराची खबरबात - नायट्रोजन युक्त हवा भरल्याने अपघाताचे प्रमाण कमी होणार?
News24सह्याद्री - नायट्रोजन युक्त हवा भरल्याने अपघाताचे प्रमाण कमी होणार?...पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
1. नायट्रोजन युक्त हवा भरल्याने अपघाताचे प्रमाण कमी होणार
नायट्रोजनयुक्त हवा भरण्याचे हे केंद्र असून या नायट्रोजन युक्त हवा भरल्याने अपघाताचे प्रमाण कमी होऊन गाडीच्या टायर चे आयुष्यमान वाढते असा दुहेरी फायदा वापरकर्त्यांना होणार असल्याची माहिती दीपक पेट्रोल पंप चे संचालक अनिल जोशी यांनी दिलीय
2. नगर अर्बन बँक प्रशासकांच्या दालनात ठिय्या आंदोलन
बँक प्रशासक यांच्याकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ करून संस्था सभासद आणि ठेवीदार यांच्या हितास बाधा पोहोचत असल्याचा आरोप सभासदांनी केला . दरम्यान आंदोलकांनी सुभाषचन्द्र मिश्रा यांच्या दालनात प्रशासकांच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त करत ठिय्या आंदोलन केले .
3. मागासवर्गीय ठोकळ कुटुंबियांना जातीयद्वेषातून मारहाण झाल्याचा निषेध
आरोपींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट व मोक्कांतर्गत कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली या वेळी दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे जिल्हाध्यक्ष संजय चांदणी कडू बाबा लोंढे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते
4. मनपाच्या तिजोरीत 48 कोटींचा कर जमा
वसुलीची गती मंदावली असली तरी डिसेंबर अखेर पर्यंत किमान 70 कोटी पर्यंत वसुली करण्याचा प्रयत्न मनपा स्तरावर सुरू आहे नगर शहरातील सुमारे 91 हजार मालमत्ता धारकांनी तब्बल 194 कोटींचा कर थकवलाय
5. शहरातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये कचऱ्याचे साम्राज्य
निधी मिळूनही विकास कामे अगदी धीम्या गतीने सुरू असल्याने या परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत
No comments
Post a Comment