Breaking News

1/breakingnews/recent

पुण्यात एका ‘मिशन’साठी आलो: चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट

No comments




मुंबई -

चंद्रकांत पाटील यांनी मी कोल्हापूरला परत जाईन असं विधान करून राजकीय धुरळा उडवून दिला होता. पुण्यात मी एका मिशनसाठी आलो आहे. मला त्यासाठीच पाठवलं आहे. हे मिशन संपताच मी परत कोल्हापूरला जाईल असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. ते पुण्यात बोलत होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका केली होती. त्यामुळे चंद्रकांतदादांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना फैलावर घेतलं. माझ्या वाक्याने कुणी हुरळूनही जाऊ नये आणि घाबरूनही जाऊ नये. मी कुठेच जाणार नाही. मी इथेच राहणार आहे. माझ्या त्या वाक्याचा शब्दश: कुणी अर्थ घेऊ नये, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. काल गिरीश बापट यांनी एक वक्तव्य केलं होते. त्यावर मी पुण्यात राह्यला आलो नाही, कोल्हापूरला परत जाईन असे  वक्तव्य केलं होते. तसंही माणसाला कुठं तरी सेटल व्हावंच लागत. आयुष्याच्या संध्याकाळी मीही कोल्हापूरला सेटल होणार आहे. याचा अर्थ आजच सेटल होणार असे नाही.

 कधी सेटल होईल सांगता येणार नाही. पाच… दहा… पंधरा… वीस  कितीही वर्षे लागू शकतात. माझ्या पक्षाने मला एक मिशन दिले होते. त्यामुळे मी इथे आलो. मिशन पूर्ण झालं की परत कोल्हापूरला जाणार, असे सांगतानाच हे मिशन काय आहे हे तुम्हाला कशाला सांगू? असंही ते पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. माझे मिशन व्यवहारात दिसत आहे. विरोधक बाहेरचे आहेत. त्यांना माझे मिशन दिसत नाही, दिसणार नाही. त्यामुळे चंद्रकांतदादा पुण्यातून गेलेले बरे असं त्यांना वाटत असा चिमटाही त्यांनी काढला. कोथरुड विधानसभा निवडणूक लढणं हे मिशन नव्हतं. मिशन दुसरं आहे. पण या शहरात पाय रोवण्यासाठी लोकप्रतिनिधी होणं गरजेचं होतं. त्यामुळे निवडणूक लढलो, असेही ते म्हणाले.



  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *